हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या अँलिकेतून राजवर्धन हि भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता विवेक सांगळे आज लोकप्रिय चेहरा आहे.
पण या लोकप्रियतेमागे असलेल्या खचता, अडचणी, त्रास सगळं काही विसरून कसं चालेल..? ज्या काळाने घडवलं.. कधी रडवलं पण आज स्वतःच्या पायावर उभं केलं त्या भूतकाळाला विसरून कसं चालेल..? म्हणूनच आज जेव्हा विवेक मागे पाहतो तेव्हा हसत त्या क्षणांबद्दल सांगतो. नुकतेच एका मुलाखतीत विवेक सांगळेने आपल्या करिअर विषयी मनमोकळा संवाद साधला आणि तेव्हा तो आवर्जून आयुष्यातील कठीण काळाबद्दल व्यक्त झाला.
या मुलाखतीत अभिनेता विवेक सांगळे बोलताना म्हणाला कि, ‘मला अजूनही आठवतं की २००९- २०१० मध्ये निर्माते काम मागायला गेल्यावर आम्हा कलाकारांचा बायोडेटा आणि फोटो मागून घ्यायचे. त्याच काय आहे.. तेव्हा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचं काही पीक नव्हतं. जेणेकरुन त्या माध्यमातून फोटो किंवा पोर्टफोलिओ निर्मात्यांना सहज दिसेल. तेव्हा अनेक टी.व्ही मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण हे मढ आयलंडला असायचे. त्यामुळे मला फक्त माझा बायोडेटा सबमिट करण्यासाठी मढ आयलंडपर्यंत प्रवास करावा लागायचा.’
पुढे म्हणाला कि, ‘तेव्हा अनेकदा माझ्या खिशात पैसे नसल्यामुळे मला कितीतरी ऑडिशनसाठी जाता आलं नाही. मढमध्ये शूटिंगच्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास करावा लागायचा, तेवढे जेमतेम पुरेसे पैसेदेखील माझ्या पाकिटात नसायचे. पण आज मला आनंद होतोय की, खूप स्ट्रगलनंतर मी जिथे पोहोचलोय ते खरंच मला आनंद देणारं आहे. मी माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलंय आणि त्यानंतर हे यश चाखलं आहे..
एक आवर्जून सांगेन ते म्हणजे.. हे असं झालं नसतं तर मला सगळंच सहज मिळालं असतं. यामुळे कदाचित मला यशाची किंमतच कळली नसती. माझ्या आयुष्यातील त्या कळीण काळानं मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत.’ एकंदरच विवेकच्या अनुभवातून काय शिकायचं असं म्हटलं तर, ‘आयुष्यात स्ट्रगल कुणालाच चुकलेलं नाही. पण ते करायची जिद्द बाळगावी लागते. तरच भविष्यात यशाची मिठाई हाती पडते. त्यामुळे करिअरच्या वाटा कोणत्याही असो.. मित्रांनो स्ट्रगल महत्वाचंच.’
Discussion about this post