हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या सख्ख्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना होऊन काहीच दिवस झाले आहेत. या धक्क्यातून अजूनही भाग्यश्री सावरलेली नाही. भाग्यश्रीची बहीण मधु मार्कंडेयचा मृत्यू आकस्मिक असल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरीही भाग्यश्रीचा संशय अटळ आहे. बहिणीच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून तिच्या मृत्यूबाबत भाग्यश्रीने संशय व्यक्त केला आहे. या धक्क्यातून सावरण्याआधी भाग्यश्रीच्या डोळ्यासमोर मधुच्या २ मुलांची जबाबदारी दिसते आहे. तर भाग्यश्रीने सोशल मीडियावर बहिणीचा आणि तिच्या दोन भाच्यांसोबतचा फोटो पोस्ट करीत वेदनादायी अनुभव शेयर केला आहे.
यामध्ये भाग्यश्रीने लिहिले आहे कि, ‘बरं! मला कसे वाटते हे सांगण्यासाठी मला सोशल मीडिया हे माध्यम वापरण्याची गरज नाही परंतु कधीकधी आपण भावना व्यक्त केल्या पाहिजे! माझ्या अंतरंगातील भावनांबद्दल मी कधीच बोलले नाही पण…… आजकाल मला फक्त सुन्नपणा जाणवतो! आसपासचे लोकं करत असलेले ढोंग मला अधिकाधिक एकटेपणाची जाणीव करून देतात.. नुकताच मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जोडीदार गमावला! ती माझ्यासाठी जग होती! तिच्या आणि आमच्या नात्याचे वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत! ती फक्त खूप खास होते! ती माझ्या अस्तित्वाचं कारण होती! माझी सपोर्ट सिस्टिम.. अशी एकही गोष्ट नव्हती जी आम्ही एकत्र केली नाही!
मी माझ्या कुटुंबात तिच्या सर्वात जास्त जवळ आहे! इतर कोणीही मला तिच्यासारखे वाटू शकत नाही! ती आज माझ्या आयुष्यात नाही हा विचारच खूप हृदयस्पर्शी आहे. जसजसे दिवस जात आहेत तसतसे मला माझ्या छातीत अधिकाधिक धडधड जाणवत आहे. मी अक्षरशः दोन दिवस नीट झोपले नाहीये. मी फक्त तिला मिस करते आणि रडते. मी डोळे बंद केल्यावर तिचा चेहरा मला दिसतो, झोपही येत नाही!’
भाग्यश्रीने पुढे लिहिलंय कि, ‘माझे आयुष्य तिच्या आठवणींनी भरलेले आहे आणि आतापर्यंत तिच्या मृत्यूचे कारण आमच्याकडे नाही. आता आमच्याकडे माझ्या भाची आणि भाच्याच्याही जबाबदाऱ्या आहेत; आपल्याला आयुष्यात पुढे जायचे आहे, म्हणून मला वाटते की माझ्या कुटुंबात काय चालले आहे याची थोडीशी कल्पना देखील कोणाला नाही. आता बहिणीच्या दुःखाचं वगळता मला तिच्यामागे सोडलेल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत! मला आशा आहे की तुम्ही सर्वजण कोणताही दोष न देता आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे आणि मी टीकेकडे दुर्लक्ष करणार आहे’.
Discussion about this post