Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नृत्य संपताच मंचावर कोसळले अन..’; भरतनाट्यम गुरु श्री गणेशन काळाच्या पडद्याआड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
47
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील मृत्यूचे चक्र काही थांबेनाच. एका मागे एक दिग्गज कलाकार कला विश्वाचा आकस्मिकरित्या निरोप घेत आहे. दरम्यान नुकतीच मनोरंजन विश्वातून आणखी एक अतिशय दुःखद वार्ता समोर आली आहे. भरतनाट्यम नृत्य साधनाकार ज्येष्ठ गुरु श्री गणेशन यांचे दुःखद निधन झाले आहे. भुवनेश्वर येथे आपल्या नृत्य कलेचे मंचावर सादरीकरण करत असतानाच त्यांना देवाज्ञा झाल्याचे समोर आले आहे. वयाच्या ६० व्या वर्षीच त्यांनी नृत्य कलेला आपले जीवन अर्पण करत जगाचा निरोप घेतला आहे.

Odisha | Bharatanatyam Guru Sri Ganeshan passed away in Bhubaneswar. He had collapsed after a performance and doctors declared him dead at a hospital pic.twitter.com/gTAmSbAzeV

— ANI (@ANI) June 10, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांची नृत्य सादरीकरण करतानाच प्रकृती अस्थिर झाली. भुवनेश्वर येथे ते ‘गीत गोविंद’ यावर आपल्या नृत्य कलेचे सादरीकरण करत होते. दरम्यान त्यांचे नृत्य संपले आणि ते एका क्षणात बघता बघता मंचावरच कोसळले. आयोजकांनी धाव घेत त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले. गुरु गणेशन यांना आपली कला सादर करताना देवाज्ञा झाली. एक कलाकार म्हणून त्यांनी शेवटचा श्वासदेखील कलेला अर्पण केला.

We are deeply saddened to hear of Bharatanatyam Guru Sri Ganeshan’s passing. Our condolences go out to his family and loved ones during this difficult time. His contributions to the world of dance will be forever remembered and cherished.

— Rajeev Kumar (@RajeevWittypuns) June 10, 2023

गुरु गणेशन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. श्री गणेशन हे मूळ मलेशियाचे रहिवासी होते. आपल्या भरतनाट्यम नृत्य सादरीकरणासाठी ते भारतात आल्याची माहिती मिळत आहे. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे, नृत्य सादर करण्यापूर्वी गुरु गणेशन यांची प्रकृती अगदी उत्तम होती. नृत्य सादरीकरण करेपर्यंत ते उत्तम होते मात्र सादरीकरण करत असताना एका क्षणाला मंच प्रकाशमान झाला आणि एकाएकी ते मंचावरच कोसळले. मग आम्ही त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात, गुरु गणेशन याना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: ANIDancerdeath newsTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group