हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र कदम म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका कॉमिक अभिनेता भाऊ. ज्याने गेल्या काही काळापासून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची पक्की छाप सोडली आहे. एखादा कॉमेडी सीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे खरंतर अत्यंत अवघड काम. पण भाऊ हे काम इतक्या सहज करून जातो कि ते अवघड असेल असं वाटतच नाही. त्यामुळे भाऊंचा एखादा चित्रपट किंवा स्किट चुकवणारा कुणी मूर्खच असेल. या रविवारी असाच हास्याचा डबल डोस घेऊन भाऊसह, संजय नार्वेकर, वैभव मांगले, प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे येत आहेत. या रविवारी झी टॉकिजवर ‘टाईमपास ३’ लागणार आहे. या निमित्ताने सगळ्यांना हसवणाऱ्या भाऊंची गोची करणारा सीन आपण जाणून घेणार आहोत.
येत्या रविवाती २० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर ‘टाइमपास ३’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या निमित्ताने चित्रपटातील गाजलेल्या सीनविषयी आपण बोलणार आहोत. ‘टाईमपास ३’ या चित्रपटातील जवळजवळ सगळेच सीन कमाल आहेत. पण एक सीन असा आहे ज्याने प्रेक्षकांनाच नाही तर स्वतः भाऊलाही हसवून सोडलं. त्यामुळे हा सीन करताना स्वतःला येणारं हसू दडवण भाऊला जाम कठीण गेलं. यामध्ये रिक्षाचालक असलेल्या शांताराम परबसमोर जेव्हा डेंजर डॉन दिनकर पाटील येतो आणि एकेक हत्यार समोर ठेवत असतो त्या सीनची जोरदार चर्चा झाली. यामध्ये भाऊ कदम आणि संजय नार्वेकर या दोन्ही हास्यवीरांनी धमाल आणली.
या सीनबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाला कि, ‘टाइमपास ३ हा सिनेमा जितका प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे तितकाच आम्हा कलाकारांनाही तो शूट करताना मजा आली आहे. या सिनेमातील असे काही सीन आहेत की जे करताना मलाही हसू आवरत नव्हतं. हा सिनेमा कधी पाहताना मला मी दाबून ठेवलंलं हसू आठवतं. या सिनेमात एक सीन आहे. पालवीचे वडील जे डॉन आहेत म्हणजेच दिनकर पाटील, पालवीचं प्रेम दगडूवर आहे हे कळल्यावर शांतारामच्या घरी येतात तेव्हा दगडू आणि पालवीच्या नात्याविषयी त्यांचे बोलणे सुरु होत असते. मात्र बोलताना दिनकर पाटील एक एक करून खिशातील पिस्तूल, सुरा असं एकेक हत्यार शांताराम समोर काढून ठेवायला सुरु करतात.
डॉन दिनकरची भूमिका करणारा संजय नार्वेकर हा सीन करत होता. त्याची ती भाईगिरीची भाषा, एकेक हत्यार समोर ठेवत बोलणं हे बघून खरंतर शांतारामला घाबरायचं होतं. पण माझ्यातला भाऊ हसायचं काही थांबेना. तो अख्खा सीन होईपर्यंत मी हसत होतो. जेव्हा कॅमेरा संजयकडे असायचा तेव्हा समोर मला हसू फुटत होतं. कॅमेरा माझ्याकडे आला की तेवढयापुरता मी गंभीर लुक द्यायचो. आमचा हा सीन असा शूट झाला. जेव्हा जेव्हा मी टाइमपास ३ बघतो किंवा या सिनेमाविषयी बोलतो तेव्हा मला या सीनच्या शूटचा किस्सा आठवल्याशिवाय राहत नाही
Discussion about this post