हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘बिग बॉस 16’ (Big Boss 16) साठीची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. बिग बॉसचा शो 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी शोचा होस्ट सलमान खान ग्रँड लॉन्चमध्ये सर्व स्पर्धकांची ओळख करून देणार आहे. या सीझनची थीम ‘सर्कस’ आहे. बिग बॉस 16 साठी एकूण १६ जणांची एंट्री निश्चित करण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पलंगावरून भांडण होईल
बिग बॉस शोच्या शेवटच्या सीझनमध्ये आपण पाहिलं होतं की एक मोठा बेडरूम होता ज्यामध्ये अनेक बेड ठेवण्यात आले होते. यावेळी शोची थीम ‘सर्कस’ ठेवण्यात आली आहे. तसेच, ‘बिग बॉस 16’ मध्ये बेडवरून गोंधळ होऊ शकतो. या सीझनमध्ये शोच्या निर्मात्यांनी 4 बेडरूम बांधल्या आहेत. आता अशा परिस्थितीत, या सीझनमध्ये, बेडवरून स्पर्धकांमध्ये गोंधळ होऊ शकतो असे मानले जाते. यासोबतच शोचे इंटीरियरही एखाद्या सर्कसप्रमाणे डिझाइन करण्यात आले आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून ‘बिग बॉस 16’ ची वाट पाहत आहेत.
बिगबॉस सेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Big Boss 16)
शोच्या प्रीमियरपूर्वीच ‘बिग बॉस 16’ च्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटोंमध्ये बेडरूम खूपच सुंदर बनवण्यात आली असल्याचं दिसत आहे. तसेच घराची संपूर्ण थीम सर्कससारखी ठेवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 16’ मध्ये 16 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. ‘बिग बॉस 16’ चे चाहते बऱ्याच दिवसांपासून या शोची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. Big Boss 16
	
					
		
		
		
    
    
    
			
                                    
            
Discussion about this post