हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वात ढीगभर मनोरंजन आणि विविध माणसांचे खरे चेहरे समोर आणणारा रिऍलिटी शो बिग बॉस मराठी हा चांगलाच लोकप्रिय आहे यात काहीच वाद नाही. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठीचे सलग ३ सिजन्स येऊन गेले आणि हे सर्व सिजन्स कमालीचे लोकप्रिय ठरते. यानंतर आता लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन येणार आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. साहजिकच ३ सिजन्सनंतर प्रेक्षकही उन्हं राडा करायला आणि एन्जॉय करायला बिग बॉसच्या आगामी सिजनची वाट पाहत होते. यानंतर आता या बातमीने प्रेक्षकांनाही दिलासा दिला आहे.
काही वर्षांपूर्वी बिग बॉस हिंदीचे यश पाहता हा रिऍलिटी शो मराठीत सुरु झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. यानंतर दैनंदिन मालिकांमधील काल्पनिक भांडणे आणि कुरघोड्यांपेक्षा एका घरात बंद असलेल्या लोकांमध्ये घडणाऱ्या खऱ्याखुऱ्या चढाओढीची स्थिती पाहायला लोकांना आवडू लागले. बघता बघता हा शो चांगलाच हिट होऊ लागला. यातील बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघ धाडे ठरली तर दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे ठरला आणि तिसऱ्या पर्वात सांगलीच्या विशाल निकमने बाजी मारली. अशा प्रकारे प्रत्येक सीजनला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता बिग बॉसचे चौथे पर्वही गाजणार यात काहीच शंका नाही.
https://www.instagram.com/p/CcnsEHwKY-s/?utm_source=ig_web_copy_link
एका वृत्त पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीच्या यशस्वी ३ पर्वांनंतर आता चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चौथा सीझन १० जुलैनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि जून महिन्यात या सीझनचे प्रोमो बाहेर येतील अशीही यात माहिती दिली आहे. गेल्या पर्वांच्या यशाकडे पाहता निर्माते चौथ्या सीजनबाबत सकारात्मक आहेत. मात्र महेश मांजरेकर यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार..? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत अद्याप महेश मांजरेकर यांनी कोणतीह अधिकृत माहिती दिलेली नाही.
Discussion about this post