चंदेरी दुनिया । सध्या बहुचर्चित टिव्ही शो म्हणून सुरू असलेला ‘बिग बॉस सिझन १३’ हा चांगलाच चर्चेत आला आहे. यंदाचा सिझन हा इतर सिझन पेक्षा वेगळा आहे. पाच आठवड्यांनी हा सिझन वाढवण्यातं आला आहे. या शोमधील टास्क, जुगलबंदी, सलमान खानचं सूत्रसंचालन या सर्वांमुळे हा शो टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर असतो. पण सध्या सलमान खान या शो सोडण्याची चर्चा होत आहे. सलमानच्या आजारपणामुळे हा शो सोडतं असल्याचं समोर येत आहे.
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची सुरूवात जशी ही स्पर्धकांमध्ये वादविवादमध्ये झाली होती. तशीचं आता हिंदी ‘बिग बॉस सिझन १३’ मध्ये देखील झाली आहे. फक्त शाब्दिक वाद नसून स्पर्धकांमध्ये हाणामारीसुद्धा झाली. आतापर्यंत हे सर्व सलमान खानने सूचसंचालक म्हणून संयमाने हाताळत होता. मात्र सलमानच्या कुटुंबियांनी त्याला या शोमुळे अधिक ताण येत असल्याने सोडण्यास सांगितलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मात्र सलमानाने अद्यापही शो सोडण्याचा निर्णय घेतला नाही.
काही आठवड्यांपासून सलमान खान बिग बॉस मध्ये रागावलेला आणि तणावाखाली असलेला दिसत आहे. सलमानने एका एपिसोडमध्ये रागाने स्वतःचं जॅकेटसुद्धा फेकू दिलं होतं. हे सर्व पाहून सलमानचे कुटुंबिय त्याच्या तब्येतीमुळे चिंतेत आहे. तसंच गेल्या काही काळापासून सलमान ‘ट्रिजेमिनल न्यूरेल्जिया’ या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्यासाठी जास्त ताण घेणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून येत्या काळात सलमान खान बिग बॉस मध्ये दिसले की नाही हे कळेलं.
Discussion about this post