Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुरू उठा ले अस्त्र जब..; महानायकाचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील फर्स्ट लूक चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Brahmastra
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांचा कोणताही चित्रपट येणार म्हटलं कि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. अगदी वयाची पंचाहत्तरी त्यांनी ओलांडली असली तरीही त्यांच्या अभिनयातील आणि डायलॉगमधली धार तितकीच कायम आहे. सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट कपूर यांचा पहिला एकत्र चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्याचे नाव ‘ब्रम्हास्त्र भाग १- शिवा’ असे आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही आयत्नात खास आणि महत्वपूर्ण मुख्य भूमिका आहे. या भूमिकेचा लूक काय असेल ..? कसा असेल ..? याबाबत लोक उत्सुक होते. यानंतर अखेर आता प्रोडक्शनकडून बिग बींच्या भूमिकेचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट अतिशय तगडी आहे. अलीकडेच चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलं होत. यानंतर आता धर्म प्रॉडक्शनने अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा कुणालाही थक्क करेल असा किलर लूक शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखमा झाल्याचे दिसत आहे. तर हातात अस्त्र आणि नजरेत अंगार दिसतोय. त्यांच्या या लूकला अगदी काहीच तासांमध्ये नेटकऱ्यांची भरभरुन पसंती दिल्याचे दिसत आहे. शिवाय याआधी महानायकाचा असा अवतार कधीच पाहिला नाही असेही नेटकरी बोलत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

धर्मा प्रोडक्शनसह अमिताभ बच्चन यांनीही आपल्या अधिकृत सोशल हँडलवर हा लूक शेअर केला आहे. सोबत एक हटके आणि लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे. यात लिहिलंय कि, ‘गुरू है गंगा ज्ञान की काटे भाव का पाश, गुरू उठा ले अस्त्र जब करे पाप का नाश’. ‘ब्रह्मास्त्र – भाग १ शिवा’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे गुरुच्या रुपात दिसणार आहे हे या कॅप्शनमधून अगदी स्पष्ट होत आहे. .

View this post on Instagram

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या लक्षवेधी लुकसह मौनी रॉय, आलिया भट्ट. रणबीर कपूर, तसेच साऊथ स्टार नागार्जुन यांच्याही मुख्य भूमिकांची काही झलक दाखवण्यात आली होती. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे

 

Tags: Brahmastra Part One ShivaDharma ProductionsInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group