हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात एकदा कुणामध्ये भांडण लागलं कि मिटणं फारच कठीण आहे. याचा प्रत्यय सध्या अर्चना गौतम आणि विकास माणिकताला यांच्या भांडणातून येतो आहे. अगदी कालच्याच भागात या दोघांनी किचनमध्ये जोरदार राडा घातला. या दरम्यान गरम पाणी फेकण्यापासून ते भांडी फेकण्यापर्यंत यांची मजल गेली. चढ्या आवाजात बोलणे, शिवीगाळ करणे.. याहूनही वरची लेव्हल दाखवायच्या नादात आता दोघेही सगळ्या सीमा पार करू लागले आहेत. आज घरात पुन्हा एकदा अर्चना आणि विकास एकमेकांना भिडले आहेत.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोघंही बाचाबाची करत भांडणामध्ये एकमेकांच्या अंगावर जाताना दिसत आहेत. इथे भांडी घासण्यावरून थेट जन्मदात्यापर्यंत हे पोहोचले आहेत. विकास अर्चनाला अडाणी बोलतो आणि अर्चना त्याला ‘कुत्र्यासारखं भुंकू नकोस चल चल’ म्हणते. यावर विकास म्हणतो, ‘तुझ्या बापाला जाऊन असं बोल.’ हे ऐकून अर्चनाचा राग अनावर होतो आणि ती म्हणते ‘बापावर जाऊ नकोस. तू स्वतः बाप बनू शकत नाहीस’.
या भांडणात विकास अर्चनाला आणखीच उत्तेजित करताना दिसतो. ती वारंवार घरातल्यांचा सन्मान कर बोलताना दिसत आहे. शेवटी बोलते कि, ‘मारून मारून मोर बनवेन.. फाडून टाकीन’. तर विकास करून दाखव म्हणतो.. तिला फुसकी म्हणतो. ज्यामुळे ती आणखीच चिडते आणि त्याच्या जवळ जात भांडू लागते. ‘तुझ्यासारख्या लोकांना मी अशीच मारते’ असंही म्हणते. दरम्यान अर्चना आणि विकासचा रोगावरील कंट्रोल सुटतो आणि ते दोघे एकमेकांच्या नाकासमोर येतात. इथे शिव त्यांच्या मध्ये येऊन उभा राहतो आणि बाकीचे सदस्य त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे भांडण काय वळण घेईन हे आगामी भागांमध्येच कळेल.
Discussion about this post