हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठीचा खेळ आणखीच रंजक होत चालला आहे. एका आठवड्यानंतर आता हळूहळू स्पर्धकांमधील गेम जिंकण्याची स्फूर्ती दिसून येत आहे. आता हळूहळू सगळेच आपले पत्ते बाहेर काढत आहेत. गेल्या आठवड्याभरात शांत असणारे स्पर्धकही गेल्या दोन दिवसात चढून चढून भांडताना दिसले आहेत. शेवटी काय तर माणसातील सर्वसामान्य प्रवृत्ती बाहेर येतेच. जसं कि, ‘स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याच बघायचं वाकून’, ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’.
साधे सुधे वाटणारे लोकप्रिय टी.व्ही कलाकार प्रत्यक्षात असेही गेम खेळतात हे बिग बॉसमध्येच पहायला मिळतं. आता बिग बॉसच घर आहे तर सगळं गोड धोड कसं राहणार ना. म्हणून घरात इतका जोरदार राडा झाला कि बस्स. आता तर काय हे लोक चक्क एकेरी भाषेवर उतरले आहेत. आपल्या वयापेक्षा मोठ्या कलाकारांनाही खालच्या दर्जाची भाषा वापरली गेली आहे. अपुर्वा नेमळेकर आणि किरण माने यांच्यात शाब्दिक चकमक अशी काही झाली कि अपूर्व थेट ए किरण माने..वर पोहोचली. आता नेमका काय प्रकार होता हा हे तुम्ही प्रोमोमध्ये पाहूच शकता.
त्याचं झालं असं की, कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्यात आधी किरण माने विकासला म्हणाले कि, ‘अरे तू शेपूट आहेस, आहेस का..?’ आणि इथून झाली वादावादीला सुरुवात. मानेंच बोलणं ऐकताच मेघा घाडगे चिडून म्हणाल्या, ‘हे शब्द बोलायची गरज आहे का…? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू. यावर किरण माने म्हणाले, ‘बस झालं.. तो किती सहन करणार..? चार पाच दिवस सहन करतो आहे तो…’ यावर पुन्हा अपूर्वा भडकली आणि म्हणाली, ‘ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे… आणि बरंच काही….. तर असं हे भांडण वाढतंच गेलं आणि फक्त वाढंतच गेलं. यानंतर आता पुढे काय होणार हे तर पुढील भागातच पहायला मिळेल.
Discussion about this post