हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राच्या अटकेनंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी आणखी एक नवीन खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात, एका मुलीने आरोप केला आहे की, शूटिंग दरम्यान हे तिच्यापासून लपवले गेले होते की, तिचे प्रायव्हेट पार्ट्स देखील व्हिडिओमध्ये दाखवले जातील. व्हिडिओ शूट करण्यापूर्वी तिला सांगण्यात आले की, तिचे प्रायव्हेट पार्ट्स व्हिडिओमध्ये दाखवले जाणार नाहीत. फसवणूक करून तिचे व्हिडिओ काढून, ते App वर प्रसारित केले गेले.
https://www.instagram.com/p/CLl7lQ6AAi0/?utm_source=ig_web_copy_link
पीडित मुलीने या संदर्भात माळवाडी पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल केला आहे. पीडितेने बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत अनेक मुली या प्रकरणात पुढे आल्या आहेत, ज्यांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात गंभीर खुलासे केले आहेत. राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. टाईम्स नाऊच्या रिपोर्ट नुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एडल्ट चित्रपट प्रकरणात दिसलेल्या पीडित मुलीचे स्टेटमेंट नोंदवले आहे. रिपोर्ट नुसार, मुलीने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की,’ तिला सांगितले गेले होते की, फक्त तिचे इंटिमेट सीन शूट केले जातील आणि तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवले जाणार नाहीत.’
https://www.instagram.com/p/CLqH68LgKx0/?utm_source=ig_web_copy_link
यासंदर्भात तिच्याकडून कॉन्ट्रेक्टही साईन करण्यात आले आणि शूटिंगसाठी काही हजार रुपये देण्यात आले. पीडितेला तिच्या एका मित्राने सांगितले की, त्याच्याकडे App वर एक एडल्ट व्हिडिओ आहे. त्यानंतर जेव्हा पीडितेने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तिला असे आढळून आले की, तिचा हा व्हिडिओ कोणत्याही कट आणि एडिटशिवाय App वर टाकण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर आतापर्यंत अनेक मुलींनी या प्रकरणावर आपला जबाब नोंदवला आहे.
Discussion about this post