Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ghar Banduk Biryani
0
SHARES
185
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करीत एक नवी आणि कौतुकास्पद कलाकृती सिनेसृष्टीला प्रदान केली. ‘झुंड’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांनी अगदी भरभरून प्रेम दिल. यानंतर नागराज मंजुळे यांनी झी स्टुडिओजसोबत ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांना असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे २५ ऑक्टोबरला घेऊन येत आहे नव्याकोऱ्या सिनेमाचा टिझर ‘घर, बंदूक, बिरयानी’.@Nagrajmanjule @ZeeStudios_ @Mangesh_Kul @ashwinpatil1310 #AkashThosar @SayajiShinde7 @aatpaat pic.twitter.com/36E2N7BQfg

— Zee Studios Marathi (@TheZeeStudios) October 22, 2022

‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट म्हणजे आगळावेगळा प्रयोग आहे आणि हा प्रयोग घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा नागराज मंजुळे सज्ज झाले आहेत. नागराज मंजुळे यांनी गेल्याच वर्षी झी स्टुडिओसोबत या चित्रपटाची घोषणा केली होती. इतकंच काय तर या चित्रपटाचा एक छोटासा मात्र अत्यंत लक्षवेधी असा टीझरदेखील प्रदर्शित झाला होता. या टीझरमुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता वाटू लागली होती.

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

मात्र यानंतर पुन्हा या चित्रपटाविषयी कोणतीही अपडेट आली नाही. एक वेगळं शीर्षक आणि वेगळ्या ढंगात सादर केलेल्या टीझरनंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार या चित्रपटाचा नवा आणि अधिकृत टिझर येत्या २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

नुकतीच झी स्टुडिओने या चित्रपटाबाबत मोठी अपडेट देताना सांगितले आहे कि, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा नवा टीझर येत्या २५ तारखेला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि माहिती झी स्टुडिओच्या ट्विटर हँडलवर दिली आहे. सोबत चित्रपटाचे एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी या भाषांसह इतर २ दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे असेही यात सांगितले आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाचे संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचे आहे.

Tags: Akash ThosarGhar Banduk BiryaniInstagram Postnagraj manjuleSayaji ShindeTwitter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group