हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना ओळखत नाही असे फार कमीच लोक राहिले असतील. आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि डॅशिंग स्टाइलमुळे अभिजित बिचुकले यांची नेहमीच सोशल मीडियावर हवा असते. त्यांचा स्वतःचा असा मोठा चाहत्यांचा फौज फाटा आहे. अभिजित यांचा पर्वा पुण्यात अपघात झाला होता आणि यावेळी ते आपल्या मित्रांसोबत होते. या अपघातात अभिजित यांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत आणि म्हणूनच हा अपघात कसा झाला याबद्दल स्वतः अभिजित यांनीच माहिती दिली आहे.
यावेळी अभिजित बिचुकले यांनी अपघाताविषयीची आणि तब्येतीविषयीची माहिती देताना सांगितले कि, ‘माझा एक किरकोळ अपघात झाला आहे. जेव्हा मी मित्रांसोबत गेलो होतो. पण कुठूनतरी अशी अफवा पसरली की, माझा कायतरी खूप मोठा अपघात झाला आहे. मला गंभीर दुखापत झाली आहे. पण मी सांगतो तसं काहीही नाहीये. मी सध्या माझ्या घरीच विश्रांती घेतोय. माझ्या खासगी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरी आराम करत आहे आणि महत्वाचं म्हणजे मी लवकरच सगळ्या चाहत्यांसाठी व समाजकार्य करण्यासाठी बाहेर येतोय.’
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे काही कामानिमित्त आपल्या मित्रांसह पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह अन्य ४ मित्र होते. अपघातात अभिजित आणि चार मित्रांनादेखील दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये अभिजित यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे आणि सध्या त्यांच्यावर घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. चाहत्यांनी अभिजित यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या तब्येतीसाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.
Discussion about this post