हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी ३’ सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांनी शो ला विशेष पसंती दिल्याचे दिसत आहे. शो सुरु काय झाला असा एकही दिवस गेला नाही कि घरात भांडणं झाली नाहीत. यात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मीरा जगन्नाथने तर अन्य स्पर्धकांना नकोसे केले आहे. तर गायत्री दातार जणू मीराचा राईट हॅन्ड झाली आहे. यानंतर आता बिग बॉस मराठी सीजन ३ चा पहिला वीकेंड क्लास काल झाला. चावडीचा पहिलाच एपिसोड असा रंगला कि बस्स. शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी चावडीवर काही स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. या भागात मीरा जगन्नाथ आणि गायत्रीचा लागलेला क्लास पाहून अगदी प्रेक्षकांनीही मजा लुटली. मांजरेकरांनी तर मीराची टिवटिव बंदच केली आणि गायत्रीलासुद्धा चांगलीच सरळ केली.
दादूस आणि अक्षय यांच्यात झालेल्या टास्कमध्ये दादूसने अक्षयने केलेली रेसिपी खाल्ली. पण या टास्कचा विजेता महिला सदस्यांनी एकमतानं ठरवायचं असताना अक्षय खरा विजेता आहे यावर मीरा अडली. तर गायत्रीनेही मान डोलावून अक्षयचे नाव घेतले. सोबत बाकी महिला सदस्यही वळविले आणि अक्षयला विजेता घोषीत केले. पण दादूसने या निर्णयावर आक्षेप घेताच आधी मीराने आणि मग गायत्रीने पलटी मारली व स्वत:चे मत दादूसला दिले. एकंदर काय तर या टास्कची पुरती लावली. परिणामी दादूस आणि अक्षय दोघांनाही याचा फायदा झाला नाही. यासाठी महेश मांजरेकरांनी मीराला तास तास तासली. मीरा तुला काय वाटलं दादूस जिंकला नाही? मला वाटलं, मला वाटलं… काय वाटलं…? असा सवाल मांजरेकरांनी केला आणि मीरा मध्येच बोलायला लागली तेव्हा आधी ऐकायला शिक़.., असेही त्यांनी बजावलं.
हे झालं मीराचं.. पण मांजरेकरांनी गायत्रीलाही चांगलीच सरळ केली. ‘गायत्री एका नंदी बैलासारखी झाली आहे. सतत मीराच्या मागे मागे करत असते. तुझा वैयक्तिक परफॉर्मन्स कुठेच दिसत नाही. तुझा बुगू बुगू करणारा नंदीबैल झाला आहे. मीरा काही बोलली की त्यावर तू विचार न करता बुगू बुगू करते. मला वाटलं होतं की तू घरात काही वेगळे, काही तरी सॉलिड खेळशील, पण तसं अजिबातच दिसत नाही. तू मीराला आंधळेपणाने फॉलो करत आहेस, असं म्हणत गायत्रीला एक दिशा देण्याचा प्रयत्न मांजरेकरांनी केला.
Discussion about this post