Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BBमराठीच्या पहिल्या विकेंड चावडीवर मांजरेकरांनी केली मीराची बोलती बंद; प्रेक्षकांनी घेतली मजा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी ३’ सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांनी शो ला भरभरून प्रेम आणि पसंती दिल्याचे दिसून येत आहे. शो सुरु काय झाला असा एकही दिवस गेला नाही कि घरात भांड्याला भांड लागलं नाही. यात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मीरा जगन्नाथने तर अन्य स्पर्धकांना अगदी नको नको केले आहे. यानंतर आता बिग बॉस मराठी सीजन ३ चा पहिला वीकेंड क्लास काळ झाला. चावडीचा पहिलाच एपिसोड असा रंगला कि बस्स. शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी चावडीवर काही स्पर्धकांची अशी फिरकी घेतली आणि सुतासारखे सरळ केले कि प्रेक्षकांनाही मजा वाटली. पहिल्याच विकेंड भागात मीरा जगन्नाथला मांजरेकरांनी चांगलंच झापलं. अर्थात इतकं की मीराची टिवटिव बंद झाली. अहो मीराचं नव्हे तर गायत्रीलासुद्धा चांगलीच सरळ केली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

या चावडी स्पेशल मध्ये मांजरेकरांनी मीराचा क्लास घेताना, आधी ऐकायला शिक अशा शब्दांत जाहीर सत्कारच केला. दादूस आणि अक्षय यांच्यात झालेल्या टास्कमध्ये दादूसने अक्षयने केलेली रेसिपी गपचूप खाल्ली आणि उत्तम प्रदर्शन केले. पण या टास्कमध्ये विजेता कोण होणार, हे महिला सदस्यांनी एकमतानं ठरवायचं असताना अक्षयचं खरा विजेता यावर मीरा अडून बसली. तर बाकी महिला सदस्य तिने वळविले आणि अक्षयला विजेता घोषीत केलं. पण दादूसने या निर्णयावर आक्षेप घेताच एक नवा वाद उफाळला. मग काय? मीराने पलटी मारली ना आणि स्वत:चं मत दादूसला दिल. एकंदर काय टास्कची आणि दादूंचा परिश्रमांची वाट लावली. ऐनवेळी ना दादूसला फायदा झाला ना अक्षयला. याचसाठी महेश मांजरेकरांनी मीराला तास तास तासली. मीरा तुला काय वाटलं दादूस जिंकला नाही? मला वाटलं, मला वाटलं… काय वाटलं…? असा सवाल मांजरेकरांनी केला आणि मीरा मध्येच बोलायला लागली तेव्हा आधी ऐकायला शिक़.., असेही त्यांनी बजावलं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

याशिवाय काल चावडीवर मांजरेकरांनी गायत्री दातारलाही बोल लगावले. ‘गायत्री एका नंदी बैलासारखी झाली आहे. सतत मीराच्या मागे मागे करत असते. तुझा वैयक्तिक परफॉर्मन्स कुठेच दिसत नाही. तुझा बुगू बुगू करणारा नंदीबैल झाला आहे. मीरा काही बोलली की त्यावर तू विचार न करता बुगू बुगू करते. मला वाटलं होतं की तू घरात काही वेगळे, काही तरी सॉलिड खेळशील, पण तसं अजिबातच दिसत नाही. तू मीराला आंधळेपणाने फॉलो करत आहेस, असं म्हणत गायत्रीला एक दिशा देण्याचा प्रयत्न मांजरेकरांनी केला. या भागानंतर प्रेक्षकांना मात्र भारी मजा वाटली आहे हे दिसले. मांजरेकरांनी जशी मीराची बोलती बंद केली तसे नेटकऱ्यांनी यावर एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत. असंच पाहिजे मिरी टिरीला, मांजरेकरांनी मीराला खडे बोल सुनावले हे बरं झालं, खराब जेवण बनवणाºयापेक्षा ते खाणारा अधिक सरस असतो, मीरा ही मारकुंड्या गाईसारखी झगडत असते नुसती, अश्या विविध कमेंट्स ने सोशल मीडियावरील कमेंट्स बॉक्स भरून गेले आहेत. आता या घरात आणखी काय काय पाहायला मिळतंय हे पाहून फारच रंजक होऊ लागले आहे.

Tags: Bigg Boss Marathi 3Gayatri DatarMahesh ManjrekarMeera JagannathSantosh ChoudhariSaturday Special
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group