Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘BIGG BOSS ओटीटी 2’ येतोय; ‘सगळ्यांचा लागणार क्लास.. कारण यावेळी जनता आहे असली बॉस’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 13, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss OTT 2
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील बिग बॉस हा अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी येतात आणि आपला खरा चेहरा दाखवतात. गेल्यावर्षी ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन आला आणि प्रचंड गाजला. त्यामुळेच आता सीझन- २ची एकदम जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता ‘बिग बॉस ओटीटी सीझन – २’ स्वतः सलमान खान होस्ट करणार असल्याने आणखीच मजा येणार आहे. पहिले पर्व भले करण जोहरने होस्ट केले असेल पण भाई तर या शोची जान आहे ना! अलीकडेच या सीझनचा प्रोमो आणि रिलीज डेट समोर आली आहे. हा प्रोमो व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘बिग बॉस ओटीटी सिझन २’ यावेळी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. शिवाय हा आगामी सीझन सलमान खान स्वतः होस्ट करणार म्हणजे फुल्ल धमाल पहायला मिळणार. ‘बिग बॉस ओटीटी सिझन २’मध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, कुणाल कामरा, सीमा तपारिया, महिप कपूर, सूरज पंचोली, योहानी, जिया शंकर, पूजा गौर, अविनाश सचदेव, आवेज दरबार, अंजली अरोरा आणि पलक पुरसवानी या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. मात्र अजूनही मेकर्सने स्पर्धकांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी २’च्या निमित्ताने आता प्रेक्षकांना स्पर्धकांना मिळणारे जीवनावश्यक साहित्य कंट्रोल करण्याची पावर देण्यात आली आहे. म्हणजेच आता या घराचा बॉस स्वतः प्रेक्षक असणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी दर आठवड्यात जो काही अन्नधान्य साठा पाठवला जातो त्यामध्ये आता प्रेक्षक हस्तक्षेप करणार आहेत. म्हणजे खरोखर आता स्पर्धकांचे दानापाणी प्रेक्षकांच्या हातात आहे. म्हणूनच ‘इस साल जनता होगी बॉस’ अशी हटके टॅगलाईन या कार्यक्रमासाठी मेकर्सने वापरली आहे. बिग बॉसच्या घरात कानाकोपऱ्यात कॅमेरे आहेत आणि लाईव्ह चॅटिंगसह यंदा बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी खास होणार असल्याचे सांगितले जात आहेत. इतकेच नव्हे तर या घरात स्पर्धक अख्खा दिवस म्हणजे २४ तास काय करत आहेत हे प्रेक्षकांना लाईव्ह पाहता येणार आहे. हा शो येत्या १७ जून २०२३ पासून जिओ सिनेमावर सुरु होणार आहे.

Tags: Bigg Boss OTTJio CinemaOTT PlatformSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group