हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोज नवे राडे, रोज नवी नौटंकी, रोज नवा ड्रामा.. बिग बॉसच्या घरात अजूनही फक्त राखीचीच हवा. बिग बॉस मराठीचा चौथा सीजन आता संपायला आला. या घरात आपण भांडण, बाचाबाची, मारामारी, शिवीगाळ असं सगळं काही पाहिलं. पण एंटरटेनमेंट राखी सावंतच्या एंट्रीनंतर सुरु झालं. गेले ८५ दिवस या घरात घरात आपली मुळं खोलवर रोवून हे सदस्य आता शेवटच्या टप्प्यावर आहेत. कोण होईल विजेता हा प्रश्न समोर असताना यांची झोप काही जाईना.. आणि म्हणूनच बिगबॉसने एक मोठा निर्णय घेतला. जो ऐकून राखीला चेव आलाय आणि आता तिने घरातल्या सदस्यांना जागवण्याची शपथ घेतली आहे.
बिग बॉस मराठी सीजन ४’चे अवघे काहीच दिवस राहिले असताना बाहेर प्रेक्षक कोण विजेता होईल..? या प्रश्नावर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे घरातले सदस्य बिगबॉसच्या नियमांची पायमल्ली करून सर्रास झोपा काढत आहेत. त्यामुळे शेवटी आता बिग बॉसने घरातील सदस्यांची झोप उडविणारा निर्णय घेतला आहे. या बिग बॉसच्या अनोख्या घराचा एक नियम आहे कि, ‘घरात जेव्हा लाईट चालू असते तेव्हा झोपायला परवानगी नाही’. हे तर आपण सारेच जाणतो. पण घरात राहणारे हा नियम का पाळत नाहीत ते काही समजत नाही. अनेकदा घरातील काही सदस्य झोपलेले दिसतात. याहीवेळी असेच झाले. शो संपत आला तरी हे स्पर्धक झोपत आहेत हे पाहून ‘बिग बॉस शेवटी वैतागले. मग काय.. बिग बॉसने त्यांना शिक्षा देण्यासाठी भर दिवसा घरातील लाईट बंद करून घरात पूर्ण अंधार करून टाकला.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस आदेश देत आहेत कि, ‘घरातील दिवे सुरु असतांना घरातील काही सदस्य झोपलेले आहेत. तर आता बिग बॉस लाईट बंद करणाऱ्याचा विचार करत आहेत’. असं म्हणताच घरातील एक एक दिवा झपाझप बंद होतो आणि घरभर अंधार पसरतो. प्रोमोमध्ये अक्षय, राखी, किरण, अमृता आणि अगदी घराचा कॅप्टन आरोह हे सगळेच झोपताना दिसत आहेत. लाईट्स बंद केल्यानंतर आरोह म्हणतो कि, ‘माझं तुम्ही ऐकता का.. यावर अपुर्वा बोलते कि, ‘तुही झोपलेला होता.. तुझ्यासाठी पण बेल वाजली होती’. यानंतर शेवटी झोपा काढण्यात अव्वल असणारी राखी म्हणते कि, ‘आजपासून मीच कोणाला झोपू देणार नाही’. आता घरातील सदस्य या शिक्षेनंतर सुधारणार का..? बिग बॉस सदस्यांची हि शिक्षा कधी संपवणार..? राखी तिने घेतलेली शपथ पूर्ण करणार का..? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा.
Discussion about this post