हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु होऊन आता जवळपास दहा आठवडे झाले आहेत. साधारण ६० दिवसांचा टप्पा पार करून या घरातील स्पर्धक एकमेकांना चुरशीची लढत देताना दिसत आहेत. प्रत्येक टास्क फक्त जिंकायचा या हेतूने सगळे स्पर्धक मैदानात उतरताना दिसत आहेत. या सगळ्यात स्पर्धक अपूर्वा नेमळेकर आणि विकास सावंत यांची चांगली गट्टी जमल्याचे पहायला मिळाले. कधी नाचले, कधी गायले, कधी मस्ती केली तर कधी भावना व्यक्त केल्या. दोघांचेही सूर बरे जुळतानाच आता त्यांच्यात अगदी एकमेकांवर हात उगरण्यापर्यंत भांडण झाली आहेत.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठी सीजन ४ चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये अपूर्वा नेमळेकर आणि विकास सावंत यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसून आले आहे. या भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यामध्ये अपूर्वा विकासला म्हणतेय कि, ‘मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे. कळत नाही का तुला’. यावर विकास म्हणतो, ‘मग माझं नाव कशाला घेतलं’. त्यावर अपूर्वाचा चिडून बोलते, ‘चल रे निघ.. चल..’ यामुळे विकासचाही पारा चढतो आणि तो म्हणतो कि, ‘ हि अनपढ समजते मला.. तू पण निघ. जाऊन बस तिथे’
यानंतर हा वाद इथेच थांबत नाही. तर वाद वाढतंच जातो आणि विकास अधिकच संतापून म्हणतो कि, ‘बोट खाली कर.. माझ्याशी बोट दाखवून बोलायचं नाही..’ असे बोलताना विकास अपूर्वाला हात लावतो. असे करताच अपूर्वा विकासवर थेट हात उगारत म्हणते कि, ‘हात लावायचा नाही हा मला.. कानफाड फोडीन’. त्यांचा वाद वाढतोय हे पाहून घरातील अन्य सगळेच स्पर्धक त्यांना थांबवायला पुढे येतात. पण अलीकडेच मैत्री झालेले हे स्पर्धक नेमके एकमेकांशी इतक्या टोकाला जाऊन का भांडत आहेत..? हे जाणून घेण्यासाठी आगामी भाग पहावा लागेल.
Discussion about this post