Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS मराठी 4: धोंगडेने घेतला पंगा; राखी सावंतचा त्रागा पाहता अमृताचं काय खरं नाय बुआ!!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 29, 2022
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
142
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे चौथे पर्व अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊन ठेपले आहे. आता काहीच दिवसात हा शो निरोप घेणार आहे आणि अशातच घरात उरलेल्या मोजक्या सदस्यांना काही भलताच चेव आला आहे. जवळपास ९० दिवस उलटले तेव्हा हे सदस्य जेव्हढे घरात सक्रिय नव्हते तेव्हढे आता दिसत आहेत. या घरात बाचाबाची, राडे, आरडा ओरडा हे सगळं तर आपण पाहिलं. पण आतापर्यंत तुम्ही कधी महिला सदस्यांची हाणामारी पाहिली आहे का..? नाही.? मग बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये अमृता धोंगडे आणि राखी सावंत तुमची हि इच्छा पण बहुतेक पूर्ण करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

भांडणं, चुगल्या करणं, प्लॅनिंग प्लॉटिंग हे सगळं तर ठीक होत. पण यावेळी राखी आणि धोंगडेमध्ये तुंबळ हाणामारी बघायला मिळणार.. होय होय.. तुंबळ हाणामारी. सध्या कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर जो प्रोमो व्हायरल होतोय तो पाहून तर शब्द अपुरे पडतील. यामध्ये अमृता धोंगडेने राखी सावंत वॉशरुममध्ये असताना बाहेरुन दरवाजाला कडी लावली. ज्यामुळे राखी बराच वेळ वॉशरुममध्ये अडकून पडली. आता बाहेर पडली तेव्हाही ती राखीचा होती.. मग ती गप्प कशी काय बसेल..? दरवाजा काय उघडला राखीचा रुद्रावतार बाहेर आला. तिनं प्रत्येकाला तू कडी लावलीस का..? असे विचारले. सगळेच नाही म्हणतायत हे पाहून तिला पुरतं कळलं कि ही करतूत अमृताची आहे.

मग तिने स्वतःचा चेहरा विद्रुप पद्धतीने रंगवला, केस मोकळे सोडले आणि जाऊन थेट अमृताच्या अंगावर बादलीभर पाणी ओतलं. पुढे जाऊन तिने अमृताचा गळाच पकडल्यासारखं प्रोमोत दिसत आहे. पण इतक्यात राखीने काही भलतं करू नये म्हणून अमृताला वाचवायला अक्षय आणि प्रसाद पुढे गेले. ज्यामुळे धोंगडे वाचली म्हणायचं.. दुसरं काय. नाहीतर राखीला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे कि राखी सावंत काय चीज आहे. होते प्रसाद, अक्षय म्हणून वाचली धोंगडे अशा नव्या म्हणीचा वापर आता सोशल मीडियावर करायला हरकत नाही. या सगळ्या प्रकारात मात्र नेटकऱ्यांनी राखीला सपोर्ट केला आहे आणि धोंगडेला फटकारले आहे. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार, धोंगडेने मुद्दाम राखीची कळ काढली मग तिने तिचं निस्तरावं. आता पुढे काय होणार हे पाहणे मात्र उत्सुकतेचे आहे.

Tags: Amruta DhongadeBigg Boss Marathi 4colors marathiPromo Videorakhi sawant
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group