हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने गोंडस परीला जन्म दिला. यामुळे आलिया आणि रणबीर आई- बाबा झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि सगळेच चिमुकल्या परीचं वेलकम करत आहेत. अशातच दुसरीकडे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर हे कपल देखील लवकरच आई बाबा होणार आहेत. बिपाशा आपल्या प्रेग्नेंसीचा प्रत्येक मुव्हमेंट सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकताच तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून चाहते मात्र प्रचंड संतापले आहेत.
हॉस्पिटमध्ये तपासणीसाठी जाण्यापासून ते मॅटर्निटी शॉपिंगपर्यंत प्रत्येक लहान गोष्ट बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचं बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट तर वारंवार सोशल मीडियावर ट्रोल झालं आहे. यानंतर आज तिने ‘बेबी ऑन द वे’ म्हणत पती करणसोबत तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, तिने एका काळ्या रंगाचा शर्ट ड्रेस घातला आहे. सोबत केस मोकळे आणि लाइट मेकअप केलाय. यात ती एका इंग्रजी गाण्यावर नाचतोय. यावेळी ती बेबी बंपवर हात ठेवून नाचताना दिसतेय. पण बिपाशाचं या अवस्थेत नाचणं नेटकऱ्यांना मात्र प्रचंड खटकलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘अशा स्थितीत डान्स करणं एव्हढं गरजेचं आहे का..?’ तर अन्य एका यूजरने लिहिले आहे की, ‘तू काय पागल आहेस का..? या अवस्थेत नाचतेय, स्वत:ची नाही तर त्या बाळाची तर काळजी घे.’ इतकेच नव्हे तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘काय छिछोर वागतेयस..? या अवस्थेत हे सगळं करायचं नसतं.’ अशा प्रकारे सोशल मीडियावर बिपाशाच्या येणाऱ्या बाळाबद्दल नेटकरी काळजी व्यक्त करत तिचा फटकारताना दिसत आहेत.
Discussion about this post