हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडच्या इतिहासात आत्तापर्यंत अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले परंतु अभिनयासोबतच आपल्या डॅशिंग लूकमुळे तरुणींच्या मनावर राज्य केलेले असेच एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. बॉलिवूडचा अमर म्हणून ओळख मिळालेल्या विनोद खन्ना यांच्या अभिनयाची आणि लूकची जादू आजही तरुणींवर आहे. आज त्यांची जयंती….
विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला होता. देशाच्या फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. त्यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर त्यांनी सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली.विनोद खन्ना यांनी 150 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटसृष्टीत ते खलनायकी भूमिकांमध्ये बरेच रुळले. त्यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ‘हम तूम और वो’ चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. विनोदजींनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘अमर- अकबर- अँथनी’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनयासोबतच ते राजकारणातही बरेच सक्रिय होते. १९९७ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पंजाबमधील गुरुदासपुर भागात भाजपतर्फे निवडणूक लढवत ते खासदार पदावर निवडून आले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’