हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । अभिनय दिग्दर्शन आणि गाणी या क्षेत्रात विशेष नावलौकिक मिळविलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. आज त्यांच्या जन्मदिवशी जाणून घेऊया त्याचा प्रवास. पुण्यात १९७५ मध्ये जन्मलेला हा अभिनेता नूतन मराठी विद्यालयात शिकला. इथेच त्याने नाट्य संस्कार या बालनाट्य संस्थेमध्ये नाटके करू लागला. एका नाटकात त्याला अभिनय न जमल्याने त्याला बॅक स्टेज काम करावं लागलं. त्यामुळे त्यानं इकडे नाटकात काम करणं सोडलं होत. दहावीत गेल्यानंतर त्याने नाटक करणे सुरू केलं. तिथेच त्याला मंजिरी ओक भेटली. दोघांची चांगलीच केमिस्ट्री जुळली. पुढे मंजिरी उच्च शिक्षणासाठी कॅनडात गेल्यावर सुबोधला पाच वर्षे वेळ मिळाला. त्यात तो अनेक स्पर्धा गाजवू लागला. याच काळात सिंबोयसिस कॉलेजातून त्याने शिक्षण पूर्ण केलं. याच दिवसांत तो पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या माध्यमातून तो दिग्दर्शन करू लागला. त्याने अनेक पुरस्कारही जिंकले.
उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण भासू लागल्याने त्याने सेल्समॅन नोकरीही सुरू केली त्यामुळे हा काही काळ नाटकांपासून दूरही झाला. पण अभिनय हाच माझा श्वास आहे हे त्याला कळल्यावर त्याने नोकरी सोडून वेगवेगळ्या मालिकांतून अभिनयाला पुन्हा सुरुवात केली. वादळवाट, या गोजिरवाण्या वाटा, मधु इथे चंद्र तिथे, पिंपळपान, दामिनी, गीत रामायण या मालिकांमध्ये त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारत आपला अनुभव वाढवला. त्याला आता चित्रपट क्षेत्र खुणावू लागलं या त्याला कामही मिळालं. त्याने सुरुवातीला आम्ही असू लाडके, आईशप्पथ, सनई चौघढे, उलाढाल, एक डाव धोबीपछाड या सारख्या चित्रपटात चांगला अभिनय केला. या नंतर रानभूल ह्या 2010 साली आलेल्या त्याच्या चित्रपटातील भूमिकेने त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्याला झी गौरव आणि मटा सन्मान चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
यानंतर त्याला अनेक चांगल्या भूमिकांचे चित्रपट मिळाले. बालगंधर्व या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. पुरस्कारात त्याला शरद पोंक्षेकडून मिळालेल्या लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्र करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याने उत्तम साकारली ही. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेने त्याला देशभर ओळख मिळाली. यानंतर त्याने बालक पालक, भारतीय, अनुमति हे चित्रपट करतात तो हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करू लागला. राणी मुखर्जीचा अय्या या चित्रपटात त्याने माधव जी उत्तम भूमिका निभावली पण त्याने मराठी कडे कानाडोळा केला नाही.
त्याने अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत इतिहास घडवणारा कट्यार काळजात घुसली हा मराठीतील अप्रतिम चित्रपट बनवला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने मराठी कडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आणि बॉक्स ऑफिसवर चांगला गल्लाही जमवला. लोकांना आता तो अभिनेत्याबरोबर दिग्दर्शक म्हणूनही आवडू लागला. यानंतर बंध नायलॉनचे हा कौटुंबिक चित्रपट बनवत प्रेक्षकांना हळवे व्हायला लावले. असा हा अष्टपैलू कलाकार आपल्या अभिनयातून दिग्दर्शनातून प्रत्येक गोष्टीला तितकाच न्याय देतोय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’