हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या त्या लहान बहीण. आशा भोसले यांनी वयाची 87 वर्ष पूर्ण केली आहेत. आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही ठळक गोष्टींवर एक नजर….
★आशा भोसले यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 मध्ये त्यांची गायन कारकीर्द सुरु झाली. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडपटांमध्ये गायला सुरुवात केली.
★आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.
★ओपी नय्यर, खय्याम, एसडी बर्मन, आरडी बर्मन, इलियाराजा, शंकर जयकिशन, ए आर रहमान अशा असंख्य संगीतकारांसोबत आशा भोसले यांची जोडी जमली.
★आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.
★आशा भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. त्यांना 2001 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.
★‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आशा भोसले यांच्या नावे सर्वाधिक गाणी गायल्याची नोंद आहे. आशा भोसले यांनी आपण 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं 14 वर्षांपूर्वी सांगितलं होतं.
★आशा भोसले यांना पाककलेचीही विशेष आवड आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज त्यांच्याकडे नेहमीच चिकन-मटण आणि बिर्याणी करुन आणण्याची मागणी करतात.
★आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.अकरा वर्षांच्या संसारानंतर 1960 मध्ये दोघं विभक्त झाले.
★महाराष्ट्र सरकारच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना 1999 मध्ये गौरवण्यात आलं होतं. तर इंडो-पाक असोसिएशनच्या ‘नाइटिंगल ऑफ एशिया’ पुरस्काराने त्यांना 1987 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’