हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता आमिर खान त्याच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यासंदर्भात तो उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये चित्रपटाचे काही सीन शूट करत होता, पण शूटिंगवरून वाद निर्माण झाला आहे. लोणीचे भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी आमिर खानवर कोविड प्रोटोकॉल न पाळल्याचा आरोप केला आहे. यासह भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खरं तर आमिर खान गाझियाबादमध्ये असल्याची बातमी ऐकल्यानंतर त्याचे चाहते खूप उत्साही झाले होते. तसेच आमिरला भेटण्यासाठी चाहते त्याच्या शूट लोकेशनवर पोहोचले. आमिरही त्यांना भेटला, परंतु यावेळी आमिर खान कडून एक चूक झाली. आपल्या चाहत्यांना भेटताना आमिर खानने मास्क घातला नव्हता. आणि अमीरच्या चाहत्यांनीही मास्क घातला नव्हता. आता भाजपच्या आमदारांनी अमीर खानवर कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप लावून अमीर खान विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. आमीरवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
लालसिंग चड्डा या सिनेमात आमिर पुन्हा एकदा करीनासोबत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आमिर खानचा लूकही यावेळी पूर्णपणे वेगळा होणार आहे. लालसिंग चड्ढा हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’