हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बंगाली अभिनेत्री सायानी घोष हिच्यावर टीका करताना भाजपचे खासदार सौमित्र खान यांची जीभ घसरली आहे. सायानी घोष एक एक सेक्स वर्कर आहे’, असं म्हणत भाजपा खासदार सौमित्र खान यांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सायानी घोष हिने ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. या मीम्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. यामध्येच आता भाजपा खासदार सैमित्र खान यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री सायानी घोषने केलेल्या ट्विटमध्ये सरस्वती देवीची अवहेलना केली आहे. हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. पण मी सांगतो की, सायानी घोषच खरी सेक्स वर्कर आहे आणि जर या वक्तव्यानंतर तुम्हाला माझ्या विरोधात तक्रार करायची असेल तर करु शकता. आता खरं तर ममता बॅनर्जी यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. नाही तर, एक मंदिर सुद्धा अस्तित्वात राहायचं नाही”, असं सौमित्र खान म्हणाले आहेत.
अभिनेत्री सायानी घोष हिने ट्विटवर एक मीम शेअर केलं होतं. या मीम्समुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हादेखील दाखल झाला आहे. हे ट्विट २०१५ चं असून त्यावेळी माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. त्यामुळे हे ट्विट मी केलेलं नाही, असं स्पष्टीकरण सायानीने दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post