Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बोल्ड निया होणार Bigg Boss OTT’ची पहिली वाईल्ड कार्ड; आता बदलणार कनेक्शन्सची समीकरणं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तीन आठवड्यांमध्ये प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवणारा अत्यंत हिट रिऍलिटी शो अर्थात ‘बिग बॉस OTT’मध्ये आता आणखी एक नवीन वळण येणार आहे. अल्पावधीत यशस्वितेची परिसीमा गाठणाऱ्या बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या कनेक्शन्सने सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्याचा विडा उचलला आहे. दररोज या शोमध्ये काही ना काही नवे ट्वीस्ट पहायला मिळतात. नुकताच संडे का वारमध्ये शोचा होस्ट करण जोहरने कोणतेही एलीमीनेशन होणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे स्पर्धक आनंदी झाले. पण.. पण.. पण त्याचबरोबर वाईल्ड कार्ड एन्ट्रीचं पिल्लू देखील करणने सोडलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

या आठवड्यात BB हाऊसमध्ये एका नवा पाहुणा येऊ शकतो असे सांगून करणने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली. त्यानंतर आता थेट इंस्टाग्रामवर फिशियल पेजच्या माध्यमातून या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं नाव स्पष्ट करण्यात आलं आहे. टीव्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा या शोची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री बनून येणार आहे. अभिनेत्री निया शर्माने स्वतः देखील अधिकृत इंस्टाग्रामवरून याबद्दलची माहिती दिली आहे. नुकतेच नियाने इंस्टाग्रामवर मजेशीर पोझ देतानाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने फोटोला कॅप्शन देत म्हटलं कि, ‘चला काही तुफानी करूया, बिग बॉस OTT १ सप्टेंबर’. त्यामुळे तिच्या एंट्रीबाबत तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

अभिनेत्री निया शर्माला बोल्ड आणि बिनधास्त म्हणून ओळखले जाते. यानंतर आत्ता बिग बॉस OTT’मध्ये निया चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी जोडी बनवणार कि जोड्या तोडणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. पण काहीही असलं तरी आता बिग बॉसच्या घराची समीकरणं बदलणार यात काहीच वाद नाही. सध्या स्पर्धकांमध्ये हा शो जिंकण्यासाठीची धडपड आणि चुरशीची लढत पहायला मिळत आहे. अलीकडेच BB हाऊसमधून स्पर्धक जीशान खान याला निष्कासित अर्थात घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने प्रतिक सहेजपाल आणि निशांत भट्ट या सह स्पर्धकांसोबत हाणामारीकरून घराचे नियम तोडल्यामुळे त्याला बिग बॉसने दंड स्वरुपात घरातून बाहेर जाण्याचा रास्ता दाखवत त्याची हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आता बोल्ड नियाची एंट्री घराचं तापमान वाढवणार? का स्पर्धकांचा आत्मविश्वास घडवणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

Tags: Bigg Boss OTTJamai Raja FameKaran joharNia SharmaOTT Voottv actressWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group