हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचे झकास अभिनेते अनिल कपूर हे नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. नेहमीच उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी ते व्यायाम करताना दिसतात. त्यांच्या या सवयीमुळे आजही ते इंडस्ट्रीतील आघाडीच्या तरुण कलाकारांसमोर भाव खाऊन जातात. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांचा जिममध्ये ट्रेडमिलवर धावतानाचा आहे. ज्यामध्ये त्यांनी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावल्याचे दिसत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनीचं नाही तर चाहत्यांनीही त्यांची शाळा घेतली आहे.
अभिनेते अनिल कपूर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता त्यांनी त्यांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता अनिल कपूर हे फिटनेस लव्हर आहेत हे वेगळे सांगायला नको. ते तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्यासाठी नेहमीच व्यायाम करत असतात. पण अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावताना दिसत आहेत.
अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी तसेच सिनेविश्वातील सेलेब्रिटी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘एवढी ऑक्सिजनची गरज आहे तर पळताय कशाला?’ तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘काय गरज आहे हे सगळं करायची..?नसती खाज’ तर आणखी एकाने लिहिलंय, ‘बघा हे आहेत श्रीमंत लोकांचे चोचले..’ तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘मला फार वाईट वाटतंय कि आता तुम्हाला ऑक्सिजन लावून पळावं लागतंय’. अशा टीकांची बरसात होऊनही एव्हढं मात्र आहे कि, अनिल कपूर त्यांच्या फिटनेस फ्रिक सवयीमुळे आणि लाइफस्टाइलमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले आहेत.
Discussion about this post