Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता मनोज बाजपेयी यांना मातृशोक; वर्षभरापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
0
SHARES
483
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या मातोश्री गीता देवी यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. आज दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी, गुरुवारी बाजपेयी यांच्या आईने दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्रस्त गीता देवी यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तब्येतीत अचानक बिघाड होऊन प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांचे वय ८० वर्षे इतके होते. अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांना मातृशोक झाल्याने त्यांच्यावर जणू दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.

Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother .

ओम शांति !
🙏

— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022

मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी या गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त होत्या. दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर या रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखलही करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याचे दिसून आल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू होते. मात्र या उपचारांदरम्यान अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Hungama🎥 (@realbollywoodhungama)

अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मनोज यांच्या दुःखात सहभागी होऊन शोकसंवेदनपर पोस्ट शेअर केल्या जात आहेत. आतापर्यंत मनोरंजन विश्वामध्ये मनोज बाजपेयी यांनी विविध भूमिका साकारून स्वबळावर इंडस्ट्रीत विशेष स्थान निर्माण केले आहे. वेब सिरिज विश्वातही मनोज यांच्या अभिनयाला तोड नाही. ‘सत्या’ मधला भिकु म्हात्रे आणि ‘फॅमिली मॅन’मधील गंभीर भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. या भूमिका साकारण्यासाठी मनोज यांना नेहमीच आई आणि वडिलांकडून प्रोत्साहन मिळत राहिले आहे. मात्र आज वडिलांनंतर आईचेही निधन झाल्याने त्याचा आधारवड हरपला आहे.

Tags: bollywood actorInstagram PostManoj BajpeyiMother Death NewsTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group