हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूडच्या दबंग भाईजानचा अर्थात अभिनेता सलमान खानचा ५७’वा वाढदिवस आहे. दिनांक २७ डिसेंबर १९६५ रोजी सलमानचा जन्म झाला.
सलमानचे मूळ नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असे असून तो मध्य प्रदेशातील इंदोर येथील आहे. सलमान खान हा पटकथा लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक (सलमा खान) यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे.
सलमानला मुळात कधी अभिनेता होण्याची आवड नव्हतीच. पण नशिबाने त्याला या क्षेत्रात आणलं, टिकवलं आणि आज बॉलिवूडवर राज्य करण्या लायक बनवलं. लहानपणी सलमानला एक उत्तम लेखक व्हायचे होते. तर वडील सलीम खान यांनी लेकाला क्रिकेटर हो असे सांगितले होते. पण सलमान झाला ऍक्टर आणि प्रेक्षकांचा भाईजान…
सलमानला अरबाज खान व सोहेल खान असे दोन भाऊ आणि अलविरा खान व दत्तक बहीण अर्पिता अशा दोन बहिणी आहेत. अल्विराचं लग्न अभिनेता/दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. तर दत्तक बहीण अर्पिताचं लग्न अभिनेता आयुष शर्मासोबत झालं आहे.
सलमानचं शालेय शिक्षण मुंबईतील वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमध्ये झाले आहे.मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पुढील शिक्षण करून त्याने डेजी इराणी ऍक्टिंग स्कूलमधून साजिद खान आणि चंकी पांडेसोबत अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. पुढे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
अभिनेता होण्यापूर्वी सलमानने ३ स्क्रिप्टसुद्धा लिहिल्या होत्या. शिवाय त्याने त्याच्या आईकडून चित्रकलेचे धडे घेतले आहेत. ज्यामुळे सलमान केवळ एक अभिनेता नव्हे तर उत्तम लेखक आणि चित्रकारसुद्धा आहे. अनेकदा सलमान चित्र काढून त्याचे प्रदर्शनही भरवतो.
सलमानला अभिनयापेक्षा लेखनात रस होता. वडिलांसारखं आपणही एक उत्तम लेखक व्हावं असं त्याला नेहमी वाटायचं. त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी त्याने वीर, चंद्रमुखी, बाघी : अ रिबेल फॉर लव्ह या सिनेमाच्या स्टोरीलाईन लिहिल्या होत्या. यासाठी त्याला त्याचे श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे पक्का लेखक होऊ शकला नसला तरी सलमानने त्याच स्वप्न काही प्रमाणात पूर्ण केले आहे असे म्हणायला हरकत नाही.
आज सलमान एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला काय वाटत हे यश त्याने विकत घेतलं आहे..? कि त्याला अगदी कुणी हातात आणून दिलंय..? तर मित्रांनो, सलमान खानने भाईजान होण्यासाठी खूप अतोनात मेहनत घेतली आहे. कधी यशाच्या साथीने तर कधी अपयशाच्या माराने तो एक एक पाऊल पुढे टाकत गेला.
अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात करताना सलमानच्या पदरीसुद्धा प्रचंड स्ट्रगल आलं. वडिलांचं नाव आणि दरारा मोठा होता पण तरीही त्याने आपल्या कामासाठी कधीच वडिलांचं नाव वापरलं नाही हे कौतुकास्पद. सलमान ठिकठिकाणी जाऊन विविध भूमिकांसाठी ऑडिशन देत असे.
या ऑडिशन दरम्यान त्याला ‘मैने प्यार किया’ हा सिनेमा मिळाला आणि यामधील त्याची मुख्य भूमिका प्रचंड गाजली. हा सिनेमा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा रोमँटिक चित्रपट ठरला. या चित्रपटातील भूमिकेने सलमानला प्रकाश झोतात आणलं. या चित्रपटाची गाणी आजही तुफान लोकप्रिय आहेत. दिल दिवाना.. बिन सजना के माने ना…….
या चित्रपटानंतर ‘अंदाज अपना अपना’, ‘हम आपके है कौन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘करण अर्जुन’, ‘बीवी नंबर वन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘हम साथ साथ है’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘तेरे नाम’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘पार्टनर’, ‘वॉन्टेड’, ‘दबंग सिरीज’, ‘रेडी’, ‘एक था टायगर’, ‘सुलतान’ आणि अजून बरेच एकापेक्षा एक हिट चित्रपट सलमानने इंडस्ट्रीला दिले.
यानंतर आता लवकरच ‘किसी का भाई, किसी कि जान’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन सलमान खान म्हणजेच आपला लाडका भाईजान आपल्या भेटीला येत आहे. सलमानने आपल्या अभिनयाइतकेच आपल्या कृतींमधून नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिने विश्वाइतकाच तो सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. बीइंग ह्युमन या संस्थेअंतर्गत तो विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो.
सलमानने सिनेइंडस्ट्रीत अनेकांना संधी उपलब्ध करून दिली. यामुळे इंडस्ट्रीत त्याला ‘गॉडफादर’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. यावरून लक्षात आलं कि अलीकडेच सलमान दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी कोनिडेलासोबत ‘गॉडफादर’ चित्रपटात दिसला आहे. शिवाय अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘वेड’मध्येसुद्धा भाईजान थिरकताना दिसला आहे.
सलमान खानवर विविध गुन्हे दाखल असून त्याच्या प्रेम प्रकरणांचीसुद्धा मोठी चर्चा असते. आज वयाच्या ५७व्या वर्षीही भाईजान अजून अविवाहित आहे. आतापर्यंत सलमानच्या कितीतरी गर्लफ्रेंड झाल्या. पण त्याने लग्न का केलं नाही..? असा सवाल अनेकदा सगळे विचारताना दिसतात. काहींच्या मते त्याला लग्न या गोष्टीत विश्वास नाही. तर काहींच्या मते त्याला त्याचं पहिलं प्रेम मिळालं नाही आणि म्हणून तो अविवाहित आहे.
असो… सलमानचं लग्न का झालं नाही..? किंवा त्याने लग्न का केलं नाही..? हा तर युनिव्हर्सल सवाल आहे. ज्याचं उत्तर देणं स्वतः सलमानसुद्धा टाळतो. पण आज भाईजानचा बर्थडे आहे. त्यामुळे जगभरात कोपऱ्याकोपऱ्यातून सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सोशल मीडियावर आज हॅपी बर्थडे भाईजान, हॅपी बर्थडे सल्लू भाई असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. शेवटी बड्डे आहे भावाचा…… जल्लोष साऱ्या गावाचा… तर मोस्ट स्टायलिश, हॅण्डसम, दबंग, सॉफ्ट हार्टेड बॉलिवूडचा चुलबुल पांडे जी.. याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
प्रेक्षकांच्या लाडक्या भाईजानला त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त HELLO BOLLYWOOD कडून हार्दिक शुभेच्छा!!
Discussion about this post