हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाउन मध्ये गरीब जनतेसाठी संकटमोचक ठरला होता. अनेक मजुरांना त्याने त्यांच्या घरी पोचवले होते. तसेच अनेक मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा त्याने घेतली आहे. कोरोना काळात परदेशी अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात देखील सोनू सूदने सिंहाचा वाटा उचचला होता. तसेच अनेक युवकांना रोजगाराच्या संधी देखील सोनू सूदने उपलब्ध करून दिली. दरम्यान, लंडनस्थित एका मॅगझीनने सोनूच्या कामाची दखल घेतली असून आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींमध्ये त्याचा पहिला नंबर लागला आहे.
लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदचा पहिला क्रमांक आहे. या स्थानावर विराजमान होण्यासाठी 47 वर्षीय सोनू सूदला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली, आणि लोकांना प्रेरित केलं, त्या सेलिब्रिटींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. सोनू सूदनेही या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणं हे माझं कर्तव्य असल्याचं मला लॉकडाऊन काळात लक्षात आलं.
ईस्टर्य आयचे संपादक असजद नजीर यांनी 50 सेलिब्रिटींची यादी तयार केली असून सोनू सूद या सन्मानाचे हक्काचे दावेदार आहेत, असे त्यांनी म्हटलंय. कारण, इतर कुठल्याही सेलिब्रिटींनी सोनू सूद एवढे काम लॉकडाऊन काळात केले नाही. त्यामुळे, सोनू सूदच्या कार्याला आमचा सलाम असल्याचेही नजीर यांनी म्हटलंय
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’