हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात ग्लॅमरची काहीच कमी नाही. या इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री बोल्ड, स्टनिंग आणि ग्लॅमरस आहे. ज्यामध्ये साहजिकच अभिनेत्री ईशा गुप्ताच्याही नावाचा समावेश आहे. ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच विविध लूकमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकदा आपल्या बोल्ड लूकमुळे तीला ट्रोलदेखील व्हावे लागते. याहीवेळी अशाच ट्रोलिंगचा सामना ईशाला करावा लागत आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमुळे ईशा गुप्ता अधिक चर्चेत होती. या सिरीजमधील तिचा बोल्ड अवतार अनेकांना घायाळ करून गेला. आपल्या बोल्ड इमेजमुळे ईशा सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता सोशल मीडियावर ईशाचा असाच एक बोल्ड लुक व्हायरल होत आहे. एका इवेंटमध्ये ईशाने ऑफ व्हाईट रंगाचा मिडी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या इवेंटदरम्यानच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत ईशा तिच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात वावरताना दिसतेय.
ईशाने परिधान केलेल्या ड्रेसमधून तिच्या शरीराचा अंतर्भाग दिसत होता. ज्यावर काही नेटकऱ्यांचे लक्ष गेले आणि परिणामी ईशा ट्रोलिंगची शिकार झाली. ड्रेस परिधान करताना ईशाने ब्रा न घातल्याने जे दिसायचं नव्हतं नेमकं तेच नेटकऱ्यांनी पाहिलं. यावर संताप व्यक्त करत एका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘घरातून निघताना आरशात स्वतःला बघता की नाही..?’ तर आणखी एकाने म्हटले, ‘थोडीतरी लाज बाळग’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, ‘तुला थंडी वाजतेय वाटत’. तर आणखी एका युझरने लिहिले, ‘बोल्ड आणि सेक्सी दिसण्यासाठी अंतर्वस्त्र न घालणे आवश्यक आहे..?’
Discussion about this post