हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. वयाची चाळीशी उलटून गेली आणि तरीही मलायका आहे तशीच फिट आणि फाईन असल्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा असते. याशिवाय मलायका तिच्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे अनेकदा ट्रोलदेखील होताना दिसते. पाह मलायका फिट लूक आणि ग्लॅमरस अंदाज तिला नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. ज्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. केवळ देशात नव्हे तर परदेशातही मलायकाचे चाहते आहेत. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चाहत्यांच्या गर्दीत मलायका अक्षरशः अडकल्याचे दिसत आहे.
त्याच झालं असं कि, अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच दुबईत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून सगळेच थक्क झाले. तिचे चाहते तर तिला पाहून अगदी वेडेचं झाले होते. यावेळी मालयकाची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तिच्याभोवती गराडा घातला होता. अंगरक्षक असूनही अनेक चाहते तिच्या खूप जवळ होते. दरम्यान सेल्फीसाठी धडपडणाऱ्या चाहत्यांची गर्दी इतकी जास्त होती कि यामध्ये मलायका अस्वस्थ झाल्याचे दिसत होती. तिने अनेक चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केले पण शेवटी धक्काबुक्कीमुळे मलायका फारच वैतागली.
मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चमकणाऱ्या काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये मलायका फारच सुंदर दिसत होती. आधी पत्रकार परिषद मग चाहत्यांची भेट घेताना मलायका दिसली. यावेळी सेल्फी काढताना मलायकाला चाहत्यांनी फॅन्सनी घेरले होते. सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. मात्र गर्दीतील एकाने सेल्फी काढताना मलायकाला धक्का दिला. त्याच क्षणी मलायकाला असुरक्षित असल्याचे जाणवले आणि तिने लगेच त्या चाहत्याला अडवले. यावेळी मलायका अतिशय स्पष्ट म्हणाली कि, ‘मला धक्का देऊ नका’.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post