हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी २७ मार्च २०२२ रोजी लॉस अँजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार पार पडला. या सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथने निवेदक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणामुळे सोहळा मीडियावर विविध प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काही लोक विलच्या कृतीचे समर्थन करीत आहेत तर काही विरोध.
Here’s the uncensored version. It was hella real. pic.twitter.com/1aBMzuRBAw
— pseudonym (@Heirof_Adonis) March 28, 2022
या प्रकरणाचे कारण म्हणजे क्रिसने विलची पत्नी जेडाच्या टक्कल असण्यावरून विनोद केला आणि यामुळे विल स्वतःला आवरु शकला नाही. जेडाचे टक्कल हे हौस नसून एक आजार आहे. या आजाराला (Alopecia) अलोपेसिया म्हणतात. सोशल मीडियावर या आजाराने त्रस्त असलेले लोक व्यक्त होत आहेत आणि यात बॉलिवूड अभिनेत्री समीर रेड्डीचादेखील समावेश आहे.
अलोपेसिया हा एक ऑटो- इम्युन आजार आहे. या आजारातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डीदेखील जात आहे. त्यामुळे तिनेही या प्रकरणाबद्दल व्यक्त होत आपल्या आजाराबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात समीराने लिहिलं कि, ‘अलोपेसिया एरियाटामध्ये तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीतील पेशी तुमच्या केसांच्या फॉलिकल्सवर हल्ला करतात. यामुळे केस गळून त्याठिकाणी टक्कल पडतं. मला २०१६ साली या आजाराचे निदान झाले. त्यावेळी अक्षयने माझ्या डोक्याच्या मागील बाजूस दोन इंच टक्कल पडल्याचं पाहिलं होतं. त्यानंतर महिनाभरात डोक्यावर आणखी दोन ठिकाणी टक्कल पडलं. त्याला सामोरं जाणं खरंच कठीण होतं.’
View this post on Instagram
पुढे लिहिले कि, हा आजार काही संसर्गजन्य नाही किंवा त्यामुळे लोक आजारी पडत नाहीत. मात्र भावनिकदृष्ट्या त्या गोष्टींना सामोरं जाणं कठीण असतं. बर्याच लोकांसाठी अॅलोपेसिया एरियाटा हा एक अत्यंत क्लेशकारक आजार आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं की, बहुतांश प्रकरणांमध्ये टक्कल पडलेल्या ठिकाणी केस परत वाढू शकतात आणि त्यासाठी टाळूवर कॉर्टिकोस्टेरॉईड्सचे इंजेक्शन द्यावे लागतात. माझ्या डोक्यावरील त्या तीन पॅचेसच्या ठिकाणी हळूहळू केस वाढू लागले आहेत. पण मला याची जाणीव आहे की यावर कोणताही इलाज नाही. जरी केस वाढू लागले असले तरी पुन्हा तशा प्रकारचं टक्कल केव्हाही पडू शकतं, असं डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांनी थोडा वेळ थांबून आत्मचिंतन करावं आणि एकमेकांसोबत संवेदनशीलपणे वागावं, अशी माझी विनंती आहे.
Discussion about this post