Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बॉलिवूडकरांचा उदंड प्रतिसाद; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Har Ghar Tiranga
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा ७५ वा असून अमृत महोत्सवी होता. यामुळे देशभरात ‘हर घर तिरंगा’ असं एक वेगळंच अभियान राबविण्यात आलं. यामध्ये देशभरातील जनतेसह सेलिब्रिटी कलाकारांनीदेखील मोठ्या संख्येत सहभाग घेतला. आपल्या राष्ट्रध्वजासोबत फोटो क्लीक करुन सोशल मीडियावर शेअर करीत प्रत्येकाने आपला सहभाग दर्शविला. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.

T 4378 – जय हिंद ! 🇮🇳 https://t.co/tG4pLXUGuD#75Independenceday #AmritMahotsav

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 15, 2022

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्य दिनाची पोस्ट शेअर करत एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय गीत जन-गण-मन ला मूकाभिनयाच्या माध्यमातून सादर केलंय आणि या व्हिडीओत ते दिव्यांग मुलांसोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ अगदी पाहण्याजोगा आहे. या व्हिडीओला शेअर करत त्यांनी ‘जय हिंद..’ असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील सोशल मीडियावर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलंय कि, ‘देश प्रत्येक क्षेत्रात भरपूर प्रगती करत जावो, भारत माता की जय!’

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

तर अभिनेता अनिल कपूर यांनी तर एक एनर्जेटिक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात ते आपल्या हातात झेंडा पकडून धावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलंय कि, ‘ताठ मानेनं पुढे जाताना…जय हिंद’

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

याशिवाय बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याने संपूर्ण कुटुंबासह मन्नत बंगल्याच्या गच्चीवर तिरंगा फडकावला. एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं कि, ‘आपल्याहून लहानांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या स्वातंत्र्यवीरांचा इतिहास समजावून सांगायला आणखी थोडा वेळ लागेल. पण त्यांच्या हातात तिरंगा देऊन तो फडकताना पाहण्याचा आनंद काही औरच’.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

तसेच बॉलीवूडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने देखील तिरंग्यासोबत फोटो शेअर केलाय आणि लिहिलंय कि, ‘शूरवीरांच्या बलिदानानं आम्हाला स्वातंत्र्याचं मोल कळालं आहे. आपण ते स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया. स्वातंत्र्याच्या शुभेच्छा!’

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

याशिवाय बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणने वेगळ्या अंदाजात स्वातंत्र्य दिन साजरा केलाय. भोला चित्रपटाच्या सेटवर क्रूसोबत त्याने भारतीय झेंडा छातीवर अभिमानानं लावला होता. दरम्यान देशभक्तीत रंगलेला हा माहोल दाखवणारा व्हिडीओ त्याने शेअर केला आणि लिहिले कि, ‘स्वातंत्र्याची ७५ वर्ष. आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण, एकमेकांना सहकार्य करुन पुढे जाऊया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!’

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

तसेच बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांनी तिरंग्यासोबत फोटो क्लीक करून शेअर केला आहे. सोबत कॅप्शन दिलंय कि, ‘आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष. जगभरातील भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!’

Tags: Bollywood CelebritiesInstagram PostTweeter PostViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group