हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचे अत्यंत महत्वाच्या अनेक व्यक्तींना गमावले आहे. यातच आता बॉलिवूड सिने विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी मिळाली आहे. शिव कुमार खुराना यांनी वयाच्या ८३व्या वर्षी जगाचा निरोप घेत अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे त्यांचे चाहते आणि सिने विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन मुंबईत झाले. ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते आणि याच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिव कुमार खुराना यांनी आयुष्यातील ३५ वर्ष बॉलिवूड चित्रपटसृष्टीत मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना, कादर खान, सदाशिव अमरापूरकर आणि अनुपम खेर अशा अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांना शिव कुमार खुराना यांनी एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आणले होते. मिट्टी और सोना, ‘फर्स्ट लव लेटर’, ‘बदनाम’, ‘बदनसीब’, ‘बे आबरू’, ‘सोने की जंजीर’ आणि ‘इंतकाम की आग’ अशा अनेक प्रसिद्ध कलाकृतींचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले आहे. म्हणूनच त्यांच्या निधनानारे बॉलिवूड सिनेविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे. शिव कुमार खुराना यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Discussion about this post