Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुंतागुंतीच्या राजकारणावर गायक लकी अलींची फुल स्टॉप प्रतिक्रिया; म्हणाले ‘I Love Uddhav…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Lucky Ali_CM
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याच्या राजकारणातील उलथापालथ हा सध्या ट्रेंडिग असणारा चर्चेचा विषय आहे. उणी तिखट मसाला लावून हा असं बोलला आणि तो तसं बोलला सांगण्यात व्यस्त आहे. तर कुणी माझा पाठिंबा तर यांनाच आणि माझा पाठिंबा तर त्यांनाच असं करण्यात व्यस्त आहे. एकंदरच काय तर राजकीय क्षेत्राला मिळालेलं हे वेगळ वळण चटकदार चर्चाना उधाण आणत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावले आहेत. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनीदेखील संबंधित विषयावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर . जी चांगलीच व्हायरल होतं आहे.

प्रसिद्ध गायक लकी अली यांनी हि पोस्ट सोशल मीडिया फेसबूकवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला.’ पुढे या पोस्टमध्ये फुल स्टॉप असं म्हणतं त्यांनी यावर मला आणखी काही बोलायचं नाही, असं स्पष्टपणे दाखवलं आहे. पण लकी अली यांची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे त्यांना बोलायचं नसलं तरीही अनेकांना या पोस्टवर विविध प्रतिक्रिया द्यायच्या आहेतच.

View this post on Instagram

A post shared by Lucky Ali (@officialluckyali)

त्याच काय आहे कि, गतवर्षी गायक लकी अली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळीदेखील त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं अगदी तोंडभर कौतुक केलं होतं. शिवाय आदित्य ठाकरे मला गाडीपर्यंत सोडायला आले आणि त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून दिला. याचाच अर्थ असा कि, त्यांना ज्येष्ठांबद्दल आदर आहे असे दिसून येते असेही लकी अली म्हणाले होते. सध्या लकी अली यांच्या या पोस्टवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टचे समर्थन केले आहे आणि आपणही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचेही म्हटले आहे.

Tags: Bollywod SingerCM Uddhav ThackreyFacebook PostLucky Aliviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group