हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीटीमध्ये अनेक कलाकार आले आणि गेले. पण यातील कितीतरी कलाकार आपल्या कलेमुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घरात करून राहिले आहेत. डान्स म्हटलं कि मिथुन दा हे नाव जस सहज तोंडात येत. तास धुमशान डान्स म्हटलं कि चीची समोर दुसरं कुणाचं नाव सुचूच शकत नाही. गोविंदाने नव्वदीच्या काळ आपल्या ठुमक्यांनी आणि हटके टायमिंगने अक्षरशः गाजवला आहे. त्यामुळे चीची है तो मुमकिन है!
आजही गोविंदाचा जबरदस्त डान्स आणि हटके अदाकारी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गोविंदाचा एक ठुमका भल्याभल्यांवर भारी आहे. आज गोविंदाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्ताने आपण गोविंदाच्या हटके गाण्यांविषयी जाणून घेणार आहोत. जी वाजली कि आजही पाय थिरकतात.
अभिनेता गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा आहे. दिनांक २१ डिसेंबर १९६३ साली गोविंदाचा जन्म मुंबईतील विरारमध्ये झाला. गोविंदाचे वडील अरुण अहुजा हे प्रख्यात अभिनेते तर आई निर्मला देवी प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. आपल्या भावंडांमध्ये गोविंदा सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना ‘चीची’ हे नाव पडले.
गोविंदाचे शालेय शिक्षण वसईतील अण्णासाहेब वर्तक विद्यालयात झाले. पुढे वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली आणि १९८६ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘इल्जाम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तो यशस्वी ठरला. यानंतर पुढे अनेक चित्रपटांमध्ये गोविंदाने कमालीच्या संवाद फेकीने आपली पात्रे वठवली आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
गोविंदाने अनेक चित्रपटांमधून अव्वल भूमिका साकारल्या. ज्यामध्ये अनेक पात्रे आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. गोविंदाची बोलायची पद्दत, डान्स करायची स्टाईल आणि हटके स्माईल यावर आजही प्रेक्षक फिदा आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५० हुन अधिक चित्रपट केले आहेत आणि यातील जवळपास सगळे हिट राहिले आहेत. या हिट चित्रपटांमधील कितीतरी गाणीसुद्धा हिट आहेत. चला तर जाणून घेऊया गोविंदाची टॉप २० हिट सॉंग्स कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:-
01. किसी डिस्को में (बडे मियाँ छोटे मियाँ)
02. मैं तो रस्ते से (कुली नंबर वन – १९९५)
03. ओ लाल दुपट्टे वाली (आँखे)
https://www.youtube.com/watch?v=HE5zJ2uU5Q0
04. अंखियों से गोली मारे (दुल्हे राजा)
05. एक चुम्मा तू (छोटे सरकार)
06. मेरी मर्जी स्टॉप दॅट (गॅम्बलर – १९९५)
07. सोना कितना सोना है (हिरो नंबर १)
08. सुनो ससुरजी (दुल्हे राजा)
09. मेरी पेंट भी सेक्सी (दुलारा)
10. मखना (बडे मियाँ छोटे मियाँ)
11. सोनी दे नखरे (पार्टनर)
12. अंगना में बाबा (आँखे)
13. बेकरार मेेै (हद कर दि आपने)
14. व्हाट इज मोबाइल नंबर (हसीना मान जायेगी- १९९९)
15. आ आ ई ओ ओ ओ (राजा बाबू)
https://www.youtube.com/watch?v=k7ed5SQdxsk
16. नीचे फूलों की दुकान (जोरू का गुलाम – २०००)
17. प्यार का सिगनल (भागम भाग )
18. अंडे का फंडा (जोडी नंबर १)
19. मैं लैला लैला (अनाडी नंबर १)
20. हेड या टेल (दिवाना मस्ताना )
Discussion about this post