Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉक्स ऑफिस कलेक्शन; कोण हिट कोण फ्लॉप..? लगेच जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Box Office Earning
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे शुक्रवारी बॉलिवूडचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ रिलीज झाला. तर दुसरीकडे कन्नड स्टार किच्चा सुदीपचा पॅन इंडिया चित्रपट ‘विक्रांत रोना’ गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट साऊथमध्ये तुफान चालतोय पण हिंदीमध्ये काही फारसा घोडदौड करेल असं वाटत नाही. पण बॉक्स ऑफिसवर अगदीच खराब कामगिरी करणाऱ्या चित्रपटांच्या तुलनेत ‘विक्रांत रोना’ बरा चालतोय असं म्हणायला हरकत नाही. जसं कि, गेल्या शुक्रवारी रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ रिलीज झाला आणि तोंडावर आपटला. तर आज आपण गेल्या २ आठवड्यातील रिलीज चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया आणि सोबतच कोणता चित्रपट हिट आणि कोणता फ्लॉप ठरतोय हे देखील जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

१) विक्रांत रोना – अभिनेता किच्चा सुदीप आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचा ‘विक्रांत रोना’ हा चित्रपट भले हिंदी भाषेत फारसा चालत नाहीये पण कन्नडमध्ये मात्र या चित्रपटाने जोरदार कामगिरी केली आहे. ‘विक्रांत रोना’च्या रिलीजआधी बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग मिळू शकतं, असा अंदाज होता. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये मिळून १६.५० कोटी रुपयांसह ओपनिंग केली. त्यातल्या त्यात रिलीज चित्रपटांमध्ये विक्रांत रोना अजूनतरी टॉप लेव्हल वर आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

२) एक व्हिलन रिटर्न्स – बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांचा नवा कोरा थ्रिलर चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ शुक्रवारी रिलीज झाला. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या गाजलेल्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी १० कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. त्यामुळे विकेंड हा चित्रपट गाजवेल अशी आशा आहे.

View this post on Instagram

A post shared by Naga Chaitanya Fans (@nagachaitanyafanss)

३) थँक्यू – अभिनेता नागा चैतन्यची मुख्य भूमिका असलेला ‘थँक्यू’ हा चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी मोठा फटका आहे. कारण याआधीच नागा चैतन्यचे जवळपास ६ ते ७ चित्रपट फ्लॉप ठरले असताना थँक्यू’सुद्धा जोरात आपटला आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये फक्त ३ कोटी रुपयांची कमाई केली असून नागा चैतन्यसाठी हि आतापर्यंतची सर्वात कमी निराशाजनक कमाई आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन फक्त ९.४३ कोटी रुपये झालंय.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir__kapoor82)

४) शमशेरा – अभिनेता रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट तर अपेक्षेपेक्षाही जास्तच आपटला. यशराज फिल्म्सच्या या पीरियड ड्रामाकडे प्रेक्षकांनी ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही हे नवलंच. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने रिलीजनंतर सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ १.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ४१.७७ कोटी रुपये आहे हि मोठी निराशा आहे.

तसं तर यापैकी कोणताच चित्रपट हिट आहे असं म्हणता येणार नाही. पण प्रत्येक चित्रपट आपलं नशीब लिहितोय असं मात्र म्हणता येईल.

Tags: Box Office EarningNaga ChaitanyaOfficial Trailerranbir kapoorShamsheraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group