Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सुबोध भावे घेऊन येतोय महिलांसाठी राखीव बस; कधी..? कुठे..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bus Bai Bus
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करतोय. झी मराठीवर ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेलच. यानंतर आता तब्बल ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनेता सुबोध भावे छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. ‘बस बाई बस’ या नव्या कोऱ्या रिऍलिटी शोमधून सुबोध खास धमाल मजा मस्तीचा प्रवास घेऊन येतोय. तो हि फक्त आणि फक्त महिलांसाठी बरं का. त्यामुळे हा शो महिलांसाठी स्पेशल ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अभिनेता सुबोध भावे हा त्याची प्रत्येक भूमिका अव्वल साकारतो यात काही वादच नाही. तर यावेळी झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या नव्या कोऱ्या मालिकेतून सुबोध सूत्र संचालकाची भूमिका साकारतोय. हा शो खास महिलांसाठी आहे. म्हणूनच तर सुबोध म्हणतोय कि, स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येतोय. अर्थातच हि बस महिलांसाठी राखीव आहे. सुबोधचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रोमोवरून तरी भन्नाट संकल्पनेचा हटके तडका असणार आहे असं वाटतंय. त्यामुळे पहिल्याच टिझर प्रोमो नंतर या कार्यक्रमाची महिलावर्गात क्रेझ दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तूर्तास ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचा फक्त टीझर व्हिडीओच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अजूनतरी या कार्यक्रमात नक्की काय आहे..? हे गुलदस्त्यात आहे. हा कार्यक्रम नक्की कसा असणार…? यात काय काय धम्माल, मज्जा, मस्ती होणार..? हे माहित नसलं तरीही महिला प्रेक्षक वर्गात याची भयंकर उत्सुकता आहे. हा कार्यक्रम येत्या २९ जुलै २०२२ रोजी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आपल्या लोकप्रिय झी मराठी वाहिनीवर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री साडे नऊ वाजता हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. त्यामुळे मजा मस्तीचा डबल डोस अनुभवायचा असेल तर आता फक्त थोडेच दिवस वाट पहा.

Tags: Instagram PostMarathi Reality showPromo Videosubodh bhaveUpcoming Showzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group