हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी आर्यन खानचे वडील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी Byju’s ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुख खान 2017 पासून Byju’s चा ब्रँड अँबेसिडर आहे.
#AryanKhanDrugCase#ShahRukhKhan
BYJU'S ने शाहरुख खान के सभी विज्ञापन रोके, प्री-बुकिंग के बावजूद रिलीज नहीं किए जा रहे ऐड https://t.co/ThCiuYOhFy— तत्त्वमसि (@berozgarvyapari) October 9, 2021
मीडिया रिपोर्टनुसार, Byju’s ने ऍडव्हान्स बुकिंग असूनही त्यांच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. किंग खानच्या स्पॉन्सरशिप डील्समध्ये Byju’s हा सर्वात मोठा ब्रँड होता. याशिवाय शाहरुख खानकडे हुंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझमसारख्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत. रिपोर्ट्स नुसार, Byju’s किंग खानला ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये देते.
क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात न्यायालयातून जामीन न मिळाल्याने आर्यन खानला शुक्रवारी आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. आर्यनसह, या प्रकरणात अटक केलेल्या इतर 5 आरोपींनाही तुरुंगात पाठवण्यात आले तर आरोपी मुनमुन धामेचासह इतर दोन महिला आरोपींना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.
Discussion about this post