Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss 16 – मारून मारून मोर बनवून टाकेन; अर्चना- सौंदर्याची हमरी तुमरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचे १६ वे पर्व सुरु झाल्यापासून घरात छोट्या मोठ्या कारणावरून भांडण होताना दिसत आहेत. कोण कोणाशी किती सलगीने वागतय इथून ते कोण किती रागावतंय..? इथंपर्यंत सगळे एकमेकांना जज करत आहेत. सध्या घरात दोन ग्रुप पडले आहेत. अर्थात आता हा शोच असा आहे कि, इथे येऊन काही दिवस झाले कि सगळेच ग्रुप ग्रुप खेळतात. पण इथे छोट्या पडद्यावरचे सीरिअल सेलिब्रिटी आणि दुसरीकडे नॉन-टीव्ही सेलिब्रिटी असे ग्रुप पडले आहेत. त्यामुळे या घरातली भांडी रोज एकमेकांवर आदळतात. दरम्यान घरातील सदस्यांमध्ये किराणा मालाचं विभाजन आणि खाद्य पदार्थांवरून राडे सुरु आहेत. या राड्यांमध्ये जोरदार राडा झाला तो अर्चना आणि सौंदर्यामध्ये.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शो च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात अर्चना गौतम हिचं सौंदर्या शर्मा आणि टीना दत्तासोबत एकदम हमरी तुमरीवालं जोरदार भांडण झालं. झालं असं की, सौंदर्या डायनिंग एरियात शालीनसोबत गप्पा मारत बसून डिनर करत होती. तिथेच बाजूला अर्चना देखील बसून जेवत होती. तेव्हा शालीन सौंदर्याशी बोलता बोलता सांगतो की, मी अर्चनाला मारलं नव्हतं आणि हे ऐकून अर्चना त्याला कडक शब्दात उत्तर देते. ती म्हणते की, यापुढे असा विचार करायची हिंमत पण करू नको नायतर जाशील घराबाहेर. यावरून सौदर्यां अर्चनावर रागावते आणि तू तुझं बघ बोलते. यावरून दोघांमध्ये चांगलं कडाक्याचं वाजतं.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी सौंदर्या थेट अर्चनाच्या स्टॅंडर्डविषयी बोलते. जे अर्चना गौतमच्या डोक्यात जातं आणि ती रागारागात सौंदर्याला म्हणते, ”तुला मारुन-मारुन मोर बनवून टाकेन”. मुख्य म्हणजे या भांडणात अर्चना एकदा नाही तर वारंवार हाच डायलॉग मारताना दिसतेय. या कडाक्याच्या भांडणानंतर सौंदर्या बेडरुममध्ये जाते आणि ढसाढसा रडू लागते. दरम्यान श म्हणते की, ”मी एका चांगल्या कुटुंबातून आलेली मुलगी आहे. त्यामुळे हे असं घाणेरडं वागणं आणि बोलणं मी सहन नाही करू शकत. एकवेळ मी ऐकून घेऊन पण माझ्या आई वडिलांचं काय”. यानंतर दुसऱ्या दिवशी अर्चना किचनमध्ये येताच टिना आणि सौंदर्या रागारागात बाहेर निघून जातात आणि बोलतात ती जाईल तेव्हाच जेवण बनेल. अशा प्रकारे घरात एकदम जोरदार भांडण सुरु आहे.

Tags: Archana GautamColors TVInstagram PostPromo VideoSaundarya SharmaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group