Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

CHYD फेम अंकुर वाढवेचं फेसबुक हॅक; अश्लील पोस्ट झाल्याचे समजताच सायबर सेलमध्ये केली तक्रार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Ankur Wadhave
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून हॅकिंगच्या प्रकरणांची वाढ झाली आहे. रोज येणाऱ्या तक्रारी पाहता सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हि बाब अतिशय धोकादायक आणि चिंताजनक आहे. अलीकडेच अभिनेता प्रवीण तरडे यांचे सोशल मीडिया हॅण्डल हॅक झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढवे याचेही सोशल मीडिया हॅण्डल फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार त्यानं सायबर पोलिसांत दाखल केली आहे. त्याच्या अकाऊंटवरून काही अश्लील गोष्टी पोस्ट केल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने थेट सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करून इंस्टाग्रामवर चाहत्यांना माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

अभिनेता अंकुरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे. सोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मित्रांनो माझे फेसबुकचे पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे. त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मेसेज करून याबद्दल माहिती देवून चिंता व्यक्त केली. तदसंबंधी मी आजच सायबरला तक्रार दाखल केलीय काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद!’ सोबतच सतर्क रहा माझ्या या पेजवरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मेसेज नाही आले. ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहचवा’.

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अंकुर वाढवेचे फेसबुक अकाऊंट हे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी हॅक झाले आहे. या प्रकरणात अंकुरची बदनामी केली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच आपले फेसबुक अकाऊंट कोणी व का हॅक केलं..? तसेच हॅकरचे लोकेशन काय आहे..? याबाबतची माहिती आपल्याला लवकरात लवकर देण्याची विनंती अंकुरने सायबर पोलिसांना केली आहे. अंकुरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमिक शोमध्ये काम करत आहे. सोबतच ‘वासूची सासू’ या नाटकातही तो काम करतो आहे.

Tags: Ankur WadhaveChala Hawa Yeu Dya FameComic ActorFacebook Account HackedInstagram Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group