हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा ट्रेंड सुरू आहे. ज्यामुळे बड्या बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूळ खाताना दिसले. ज्यामध्ये आमिर खान, अक्षय कुमार अशा कलाकारांचा समावेश आहे. त्यानंतर आता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीत सिंग यांचा ‘थँक गॉड’ हा फॅमिली ड्रामा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसले. या चित्रपटातील अजय देवगण साकारत असलेल्या चित्रगुप्त या भूमिकेचे रूप, डायलॉग आणि काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर चित्रपटात काही बदल करण्यात आले आहे.
या चित्रपटातील काही सीन्समुळे धार्मिक भावना दुखावल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार आणि मेकर्स विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. हा वाद दिवसागणिक वाढत असल्याचे पाहताच मेकर्सने यामध्ये काही बदल करण्याचे ठरविले आणि तसे बदल केलेदेखील आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या सर्टिफिकेटसाठी हा चित्रपट पाठवण्यापूर्वी ३ मुख्य बदल केल्याचे समोर आले आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थॅंक गॉड’ चित्रपटाला शुक्रवारी म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सेन्सॉरनं U/A सर्टिफिकेट दिलं आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, सिद्धार्थ मल्होत्राचा मृत्यू होतो आणि तो थेट चित्रगुप्ताजवळ पोहोचतो. इथे त्याच्या पापांचा हिशोब होतो. यामध्ये रकुल प्रीत सिंगने सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर नोरा फतेहीने आयटम सॉंग केले आहे. आता चित्रपटातील बदलांविषयी बोलायचं झालं तर यात ३ बदल केले आहेत.
फ्रेममध्ये दिसणारा मद्य कंपनी ब्रँडचा लोगो पुसट करण्यात आला आहे. शिवाय मंदीराच्या सीनला दुसऱ्या अॅंगलने दाखवण्यात आलं आहे. तर तिसरा बदल सिनेमाच्या सुरुवातीला लिहिलेल्या डिस्क्लेमर कॉन्टेंटमध्ये केला आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार चित्रगुप्त यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. तसंच सिनेमातही दाखवलं आहे.
Discussion about this post