हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुमारे तीन महिन्यांपासून चालू आहे. प्रकरणात एम्स टीमने त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीबीआयवर सोपवला होता. या रिपोर्टमध्येसुशांतचा मृत्यू ही आत्महत्याच आहे असा निष्कर्ष एम्सने दिला आहे. मात्र या रिपोर्ट वरच संशय घेत हा रिपोर्ट सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या चाहत्यांनी स्विकारण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रिपोर्टवर संशय घेणा-यांना खडेबोल सुनावले आहेत.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, चेतन भगत यांनी म्हटलं की लोकांनी सुशांतच्या मृत्युच्या तमाशा बनवुन ठेवला आहे. त्याने सांगितलं की ‘तो कधी एम्सला गेला नाही मात्र ती एक संस्था आहे जिथे प्रवेश आणि जॉब मिळणं कठीण आहे. चेतनने एम्सची तुलना आयआयटी दिल्लीसोबत करत म्हटलं की जर कोणी अशा संस्थेला भ्रष्ट म्हणतं तेव्हा खूप राग येतो.’ त्यांनी एम्सच्या रिपोर्टवर संशय करणा-यांवर राग व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की एम्स रिपोर्टवर संशय करणा-यांनी आधी या प्रकरणात पुरावे सादर करावेत.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यु प्रकरणात चेतन भगत यापूर्वीही अनेकदा बोलला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सुशांतचा डेब्यु सिनेमा काय पो छे चेतन भगतच्या ‘३ मिस्टटेक्स ऑफ माय लाईफ’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’