हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या काही दिवसात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक बहारदार मराठमोळा चित्रपट येणार आहे. घरापासून लांब असलेल्या प्रत्येकाची कथा आणि व्यथा सांगणारा हा चित्रपट आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाची कथा मनाला भिडणारी असल्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेत आहे. गेल्या काही दिवसापासून यातील एक एक व्यक्तिरेखा गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा आता समोर आली आहे. हि भूमिका अतिशय करारी आणि लक्षवेधी असून या भूमिकेला चिन्मय मांडलेकर न्याय देताना दिसणार आहे.
त्याच्या व्यक्तिरेखेची एक झलक पाहता तो सनीचा म्हणजेच ललित प्रभाकरचा भाऊ दाखवल्याचे समजते. विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत आहे. तर सनी आणि त्याच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय.? हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. यामध्ये चिन्मयचा अतिशय वेगळा आणि फ्रेश असा लक्षवेधी लुक समोर आला आहे. जो सर्वांना भावतोय. त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.
क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह- निर्माते आहेत. या चित्रपटातील ललितची भूमिका आणि नाचणार भाऊ हे गाणे आधीच प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे.
Discussion about this post