हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून त्याने आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटातही चिन्मयने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘द- काश्मीर फाईल्स’ चित्रपटात बिट्टा दहशतवादी नकारात्मक भूमिकेची वाहवाह सर्वत्र झाली. या भूमिकेसाठी लागणार क्रूरपणा त्याने चेहऱ्यावर हुबेहूब आणला. यांनतर आता आगामी चित्रपटात चिन्मय नथुराम गोडसे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
‘गांधी- गोडसे एक युद्ध’ या आगामी चित्रपटात चिन्मय गोडसे यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर मंगळवारी २७ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आजतागायत बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीला एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे तब्बल ९ वर्षांतर कमबॅक करत आहेत. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथूराम गोडसे या व्यक्तिरेखांना समोर आणले आहे. या सिनेमामध्ये महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर आपल्याला नथूराम गोडसे यांच्या भूमिकेत दिसतो आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
असगर वजाहत यांनी ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर राजकुमार संतोषी यांनी पटकथा लिहिली आहे. या सिनेमाच्या कथानकात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.रिपोर्टनुसार, ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा येत्या वर्षात प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित केला जाणार आहे. म्हणजेच २६ जानेवारी, २०२३ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल.
माहितीनुसार, बॉक्स ऑफिसवर ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’ हे सिनेमे आमने सामने येत आहेत. त्यामुळे कोण कोणाला जोरदार टक्कर देणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. शाहरुखचा ‘पठाण’ हा २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.
Discussion about this post