हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात NCBकडून चांगलाच वेग धरत आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या माध्यमातून अन्य धागेदोरे तपासले जात आहे. दरम्यान शाहरुख खानचा लेक आर्यन खान याला सोडविण्यासाठी अर्थात जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवूडकर आणि त्यांच्यासह काही बॉलिवुडभक्त लोकप्रतिनिधी राजकारण करीत अगदी खुल्लेआम आपले समर्थन दाखवत आहेत. शिवाय या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सतत टीकांचा वर्षाव करत आहेत. मात्र त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सक्षमपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभी आहे. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे आणि आपण महिला म्हणून क्रांती रेडकरच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
काय जमाना आहे..
आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं
तर
जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी @KrantiRedkar वर अभद्र भाषेत टिका सुरू आहेजेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं
क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2021
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे कि, “काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना समीर वानखेडे, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण जास्मिन वानखेडे याना टार्गेट केले जात आहे. नवाब मलिक तर अक्षरशः त्यांच्या मागे हात धुवून लागलेत का काय? असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे. दरम्यान याआधी अभिनेत्री क्रांती रेडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट करीत टीकाकरांना प्रत्युत्तर आणि कौतुककर्त्यांचे आभार मानले होते.
या पोस्टमध्ये क्रांतीने लिहिलेले कि, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेष करून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या स्तुत्य कार्याचे रिपोर्टिंग माध्यमातून सातत्याने होत आहे. गुंडांना पकडण्याचे त्यांचे कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असेच वाढत जाईल अशी आशा करते. समाजात असे काही घटक आहेत जे बॉलिवूडवर निशाणा साधल्याचे म्हणत एनसीबीला दोष देत आहे. मी त्यांना विनंती करते की कृपया आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर टीका करा. ते दररोज संघर्ष करत असताना आपण आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून अशा टिप्पणी देतो. निःस्वार्थपणे देशाची सेवा करण्यासोबत चांगले वागूयात.
Discussion about this post