हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चित्र विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद विरुद्ध भाजपा नेत्या चित्रा वाघ असा वाद सुरु आहे. ‘उर्फीला नव्हे तर नंगा नाच वृत्तीला आहे’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी चित्रा वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये नंगा नाच चालू देणार नाही असा कडक इशारा उर्फी जावेदला दिला आहे. यावेळी त्यांनी केवळ उर्फीच नव्हे तर तिच्या समर्थनात उभ्या राहिलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही टोला लगावलाय.
व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच
समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे (5/5)#सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 3, 2023
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले कि, ‘मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्याचमुळे मी ही भूमिका घेतली आहे.’ यावेळी ‘शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगा नाच चालू देणार नाही’, असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.
भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये
महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ?विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे
आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?#सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 4, 2023
शिवाय, ‘माझा विरोध उर्फीला नाही तिच्या नंगा नाच वृत्तीला आहे. ज्या ठिकाणी समाज महत्वाचा असतो त्याठिकाणी राजकारण करू नये. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात तसे झाले नाही. जो नंगा नाच सुरू आहे ते आपल्या महाराष्ट्राला शोभनीय नाही. असला नंगा नाच राज्यात चालू देणार नाही’. यावेळी उर्फीच्या समर्थनात बोलणाऱ्या महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर याना सवाल विचारात चित्रा वाघ म्हणाल्या कि, ‘कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे महिला आयोग म्हणतंय. अरे आधी कपडे तर घाला मग ठरवा कुणी काय घालायचे. अशावेळी महिला आयोगाला जाब विचारायचा नाही तर मग काय करायचे..? केसेस सोडवणे तुमचे काम आहे. तर अशा अश्लील व्हिडिओची दखल घेतली नाही मग आयोगाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारही तुम्हाला नाही. एकाच विषयात दुटप्पी भूमिका घेणारा हा आयोग आहे.’
भाषा नको तर कृती हवी..
सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ?
आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? pic.twitter.com/O0KSb9A5r7
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 4, 2023
‘वेबसिरीजच्या पोस्टरवर अंगप्रदर्शन करतात म्हणून नोटीस काढली. एका ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेत वेब सिरीज, दिग्दर्शक आणि अभिनेत्रीला नोटीस पाठवली. पोस्टरमुळे अंग प्रदर्शन व धुम्रपान संदर्भात उमटत असलेल्या प्रतिक्रियांमुळे नोटीस काढणारे असा नंगानाच कसा सहन करतात..? व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हा नंगानाच सहन करणार नाही. महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरसाठी तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली.
पण उर्फीला गोंजारायचे काम सुरू आहे. उत्तर नको कृती हवी. महिला आयोगाने उडी मारून तरंगू नये प्रकरण काठाला लागतं का बघा. या राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे त्यामुळे तुमच्यावर अवलंबून नाही. सावित्रीबाई यांची जयंती साजरी करून सावित्री होता येत नाही.’
Discussion about this post