हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन वर्षात कोरोनासारख्या महामारीने कुणालाच स्वस्थ जगू दिल नाही. या महामारीच्या भीतीने कोणताही सण किंवा उत्सव जोशात, उत्साहात साजराचं झाला नाही. यांनतर जेव्हा हि महामारी ओसरली तेव्हा निर्बंध उठले आणि लोक जगू लागली. त्यामुळे यंदा प्रत्येक सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यंदाची दहीहंडी सुद्धा तब्बल दोन वर्षांनी साजरी केली जात आहे आणि त्यामुळे बालगोपाळांचा नुसता जल्लोष आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही विविध सेलिब्रिटी विविध ठिकाणी हंडीसाठी उपस्थित राहून गोपाळांचे उत्साह वाढवतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर आदी ठिकाणी अनेक सेलिब्रिटी हजर होते. दरम्यान या सेलिब्रिटींची हंडी किमान तीन ते पाच कोटी रुपयांच्या आसपास गेली असणार आहे.
दहीहंडी असा सण आहे ज्याचा क्रीडा म्हणून एक वेगळाच दर्जा द्यावा अशी नेहमीकच सगळे मागणी करत असतात. त्यामुळे दहीहंडीसाठी विविध आकर्षण म्हणून रोख रक्कम, ट्रॉफी आणि सेलिब्रिटींची उपस्थिती असे प्रयोग केले जातात. यंदाही ठिकठिकाणी मोठमोठ्या दहीहंडीचे आयोजन केल्याचे दिसले आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमांसाठी मोठमोठे सेलिब्रिटी हजर राहिले होते. दरवर्षी अशा सणासुदीला कलाकारांना भलतीच मागणी असते. विशेष करून त्यांना ज्यांची लोकप्रियता अधिक आहे. यासाठी अशा कलाकारांना लाखाच्या घरात मानधन दिले जाते. हे मानधन कलाकार किती लोकप्रिय आहे त्यावर ठरत.
गेली दोन वर्ष तर हा सण काही झाला नाही. पण यंदा दही दुधाचा काला जंगी झाला. तर सेलिब्रिटींसाठी पैशाचा पाऊसच पडला. अनेक ठिकाणच्या गोविंदा उत्सवात मराठी तसेच हिंदी कलाकार हजर होते. कलाकारांसाठी हा एक नवीन व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरू आहे. यामुळे चित्रपट आणि विविध प्रोजेक्ट यांच्या व्यतिरिक्त काही पैसे सेलिब्रिटी सुद्धा कमावतात. शिवाय त्यांचे चाहते त्यांना फार जवळून पाहूनच आनंदी होतात. त्यामुळे यंदाचा दहीकाल्याचा उत्सव चाहते आणि सेलिब्रिटींसाठी मोठा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
Discussion about this post