हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु झाल्यापासून वारंवार चर्चेत राहिला आहे. याच कारण म्हणजे चौथ्या पर्वातील सदस्य. यांपैकी प्रत्येक जण घरातूनच भांडायचं, लढायचं आणि भिडायचं या वृत्तीचं जणू बालकडू घेऊन आला आहे. घरात पाय टाकल्यापासून या सिजनमध्ये कोण ना कोण भांडतच आहे. बिग बॉसचा खेळ हा खेळ कमी आणि भांडाभांडी, चिडचिडीचा खेळ जास्त वाटतोय. गेल्या एपिसोडमध्ये निखिल राजेशिर्केने बिग बॉसच्या खेळाचा निरोप घेतला. या एव्हिक्शननंतर घर पुन्हा एकदा दुमदुमलं ते अमृता आणि यशश्रीच्या भांडणाने.
त्याच झालं असं कि, बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडत आहे. यावरून स्पर्धक अमृता देशमुख आणि यशश्रीमध्ये जोरदार कडाक्याचं भांडण झालं. अगदी कसं माहितेय..? नळावर पाणी भरायला तू तू मैं मैं करणाऱ्या बायकांसारखं. सध्या हा भांडणाचा प्रोमो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये अमृता आणि यशश्री दोघीही चढ्या आवाजात एकमेकींवर वरचढ होताना दिसत आहेत. दोघीही कुणाचं ऐकायला तयार नाहीत मात्र ऐकवायला तयार आहात.
या प्रोमोमध्ये दिसतंय कि, ‘अमृता देशमुखने अगदी चढ्या आवाजात यशश्रीला म्हटलं कि, ‘स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखं वागायचं…, ज्या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना…, आता अशी भाषा आणि एव्हढा चढा आवाज ऐकल्यावर यशश्रीचा पण पारा चढला. मग काय..? दोघीही कचाकचा भांडायला लागल्या. यशश्री म्हणाली कि, ‘मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये.’ आज घरामध्ये पार पडणाऱ्या ‘फटा पोस्टर निकला झिरो’ हे नॉमिनेशन कार्य अमृता आणि यशश्री गाजवताना दिसणार हे नक्की.
Discussion about this post